लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीला कांदिवलीतून अटक

तस्करी करण्यासाठी मुले चोरी करीत असल्याचा संशय

लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीला कांदिवलीतून अटक

फुटपाथवर राहणाऱ्या कुटूंबातील लहान मुलांना चोरून त्यांची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला कांदिवली पूर्व येथून अटक करण्यात आली आहे. ही टोळी एका मुलांची तस्करी करणाऱ्या एका बड्या रॅकेटचा भाग असल्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

 

उत्सवाच्या दिवसात शहरात पोट भरण्यासाठी येणाऱ्या कुटुंबापैकी एक कुटुंब कांदिवली पूर्व येथील फुटपाथ राहत होते, खेळणी विकून पोटाची खळगी भरणाऱ्या या कुटुंबातील २ वर्षाच्या मुलीला २६ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास कोणीतरी झोपेतून उचलून घेऊन गेले होते. याप्रकरणी कुरार व्हिलेज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

कुरार व्हिलेज पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याची उकल करण्यासाठी एक पथक तैनात करण्यात आले, या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर मोहम्मद सय्यद, सईद खान, फुरकान खान आणि इक्बाल सय्यद या चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी अपहरण केल्याची कबुली दिली आणि अपहरण करण्यात आलेली मुलगी त्यांचा पाचवा सहकारी तहकीन शेख याच्याकडे असल्याची माहिती ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांनी दिली.

 

 

 

पोलिस पथकाने तात्काळ तहकीन शेख याचा शोध घेऊन त्याच्या ताब्यात असलेल्या २वर्षाच्या मुलीची सुखरूप सुटका करून तहकीन शेख याला अटक करण्यात आली. कुरार व्हिलेज पोलिसांनी पाचही आरोपीना अटक करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा:

३००० मीटर स्टीपलचेसमध्ये भारताच्या पारुलला रौप्य तर प्रीतीला कांस्य पदक

फडणवीस म्हणाले, राज्यात भाजपाच बॉस!

गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरे काय म्हणाले?

बिहारमध्ये जातिनिहाय गणनेत ८१ टक्के हिंदू, ६३ टक्के ओबीसी!

 

प्राथमिक तपासात ही टोळी मुले चोरी करून त्यांची तस्करी करीत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून चोरलेल्या मुलाचा वापर भीक मागणे तसेच गुन्हेगारी कृत्यासाठी करीत असावे अशी शक्यता वर्तवली आहे. या टोळीच्या चौकशीत मुंबई तसेच परिसरातून गायब झालेल्या लहान मुलाचे गूढ उकळण्याची शक्यता असूनया टोळीकडे या अनुषंगाने कसून चौकशी सुरू आहे, लवकरच या मुले चोरणाऱ्या रॅकेटच्या मुळापर्यत पोहचू अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version