आयुर्वेदिक उपचारांच्या नावाखाली फसवणुकीची ‘गोळी’; अटक झाली युनानी डॉक्टरांची टोळी

व्यवसायिका कडून १४ लाख रुपये उकळून त्याच्यावर उपचार करून फसवणूक

आयुर्वेदिक उपचारांच्या नावाखाली फसवणुकीची ‘गोळी’; अटक झाली युनानी डॉक्टरांची टोळी

युनानी आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली रुग्णांची लूटमार करणाऱ्या एका राजस्थानी टोळीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीने मागील काही महिन्यात मुंबईतील ६ रुग्णांकडून युनानी आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक केल्याची माहिती तपासता समोर आली आहे.मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ३च्या पथकाने या टोळीचा शोध घेऊन एका युनानी डॉक्टरसह ४ जणांना अटक केली आहे.

 

मोहम्मद शेरु शेख मकसुद खॉ उर्फ डॉ. आर. पटेल (४९), मोहम्मद नफीस मो. शरीफ (३९ ),मोहम्मद आसिफ मो. निसार (२७) आणि मोहम्मद अशिफ मो. शरीफ (४४) असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. हे चौघेही राजस्थान राज्यात राहणारे आहेत. ही टोळी मूळची राजस्थान राज्यातील असून महाराष्ट्रासह इतर राज्यातील शहरामध्ये काही महिन्यासाठी डेरा टाकून युनानी आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली लूटमार करीत होती.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ऑक्टोबर महिण्यात वडाळा येथे राहणाऱ्या व्यवसायिकाने तक्रार दाखल केली होती.या व्यवसायिकाला ट्रीमर नावाचा आजार होता, हा आजार युनानी आयुर्वेदिक उपचाराने बरा होऊ शकतो असा विश्वास या टोळीने दिला होता. व या व्यवसायिका कडून १४ लाख रुपये उकळून त्याच्यावर उपचार करून फसवणूक केली होती. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा:

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश गृहमंत्री फडणवीसांचे नाहीत!

अबब!! १९२६ सालच्या दुर्मिळ मॅकलन व्हिस्कीसाठी मोजले २.७ मिलियन डॉलर्स

पोलीस कॉन्स्टेबलची लायब्ररीमध्ये गळफास लावून आत्महत्या

कांदिवली पूर्व विधानसभेत छठ पूजा उत्सव उत्साहात

मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३ चे पथकाला या युनानी डॉक्टरांची माहिती मिळाल्यानंतर कक्ष ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक समीर मुजावर, पो.ह. कृतिबास राऊळ, अरूण घाटकर, वैभव गिरकर, सचिन सरवदे, पो.शि. विकास चव्हाण, राहुल पाटील, गोविंद पानखडे, व पो.ह. चालक अनिकेत मोरे या पथकाने या टोळीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली.या टोळीजवळून पोलिसांनी वैदयकिय उपचाराचे सर्व साहित्य, ०९ मोबाईल फोन, सिमकार्डस्, वॅगनार मो/कार व गुन्हयातील फसवणुक झालेली १४ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

 

ही टोळी इतर साथीदारां सह दोन ते तीन महिन्यांसाठी महाराष्ट्रात येतात व मनोर पालघर, भिवंडी-ठाणे, मालेगांव, नाशिक या ठिकाणी मोकळया मैदानात तंबू बांधून कबिल्यात वास्तव्य करतात.सावज हेरण्यासाठी ही टोळी मुख्य शहरातील रुग्णालयाच्या बाहेर उभी राहून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बाहेर गाठतात, त्यानंतर ही टोळी स्वतःला युनानी आयुर्वेदिक वैदयकिय क्षेत्रातील नामांकित डॉक्टर असल्याचे भासवून त्यांचे अहमदाबाद, गुजरात येथे युनानी आयुर्वेदिक उपचाराकरीता रुग्णालय असल्याचे सांगतात. त्यानंतर त्या रुग्णाला युनानी आयुर्वेदीक उपचार पध्दतीने घरी येऊन उपचार करू असे सांगून रुग्णाकडून उपचाराच्या नावाखाली लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक करीत होते.

Exit mobile version