मद्यधुंद अवस्थेत मॉडेलचा विमानतळावर गोंधळ

ही मॉडेल नवी दिल्ली येथे राहणारी असून गुरुवारी ती मुंबईत आली

मद्यधुंद अवस्थेत मॉडेलचा विमानतळावर गोंधळ

दिल्लीतील एका ३५ वर्षीय मॉडेलने मद्यधुंद अवस्थेत मुंबई विमानतळावर गोंधळ घालून पोलिसांना मारहाण केल्याची घटना २६ जानेवारी रोजी दुपारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी या मॉडेल विरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

रुपाली जितेंद्र कुमार असे विमानतळावर गोंधळ घालणाऱ्या मॉडेलचे नाव आहे. ही मॉडेल नवी दिल्ली येथे राहणारी असून गुरुवारी ती मुंबईत आली होती. दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास ती मद्याच्या नशेत धुंद होती. तिने विलेपार्ले येथील विमानतळ परिसरात असलेल्या रिक्षा स्टॅण्ड जवळ धिंगाणा घालण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा:

कॅप्टन कूल म्हणतोय ‘लेट्स गेट मॅरिड’

सुरक्षा नसल्याचे कारण देत बनिहालमध्ये भारत जोडो यात्रा थांबवली

अदाणींचा गेम कोण करतोय? कही पे निगाहे, कही पे निशाना…

आर्थिक तंगीने पाकिस्तान बेजार, आता चलनसाठा आटू लागला

दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या बंदोबस्तवर असलेल्या महिला पोलीस अधिकारी यांनी तिला आवरण्याचा प्रयत्न करू लागताच या मॉडेलने या महिला पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर हात उगारु लागली. या मॉडेलला आवर घालण्यासाठी महिला पोलीसांची अधिक कुमक मागवून तिला ताब्यात घेऊन विमानतळ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी तिला समजावून शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु अधिकच गोंधळ घालून पोलिसांच्या अंगावर धावून जाऊ लागली.

महिला पोलीस अधिकारी यांनी तिला अखेर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तिने महिला पोलीस अधिकारी याच्यावर हात उगारत मारहाण केली. अखेर पोलिसांना बळाचा वापर करून तिला नियंत्रणात आणून तिच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे, धमकी देणे याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आता तिला अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version