25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाआईला विमानात बसविण्यासाठी आले आणि पोलिसांच्या तावडीत सापडले!

आईला विमानात बसविण्यासाठी आले आणि पोलिसांच्या तावडीत सापडले!

सहार पोलिसांनी जोडप्या विरोधात केला गुन्हा दाखल

Google News Follow

Related

आई व्यवस्थित विमानातून जाईल का, या काळजीपोटी एका जोडप्याने भलताच निर्णय घेतला. ते आईला विमानात बसवून द्यायला आले पण…

कुवेत देशात प्रथमच जाणाऱ्या आईला विमानात बसविण्यासाठी आलेल्या जोडप्याला विमानाचे बनावट तिकिटाप्रकरणी अटक केली आहे. मुंबईतील सहार पोलिसांनी ही कारवाई केली असून आम्ही विमानातून प्रवास करणार नव्हतो, केवळ आईला विमानात सुखरूप बसविण्यासाठी आलो होतो असा दावा या जोडप्याने केला आहे.

सहार पोलिसांनी या जोडप्या विरोधात बनावट दस्तावेज, फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. दरम्यान या जोडप्याना विमानाचे बनावट तिकीट बनवून देणाऱ्या ट्रॅव्हल्स एजंटचा शोध घेण्यात येत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बनावट तिकिटांसह प्रवेश करणाऱ्या राजस्थानमधील एका विवाहितेला तीच्या पतीसह सहार पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांना अटक केल्यानंतर, त्यांनी पोलिसांना सांगितले की, कुवेतला प्रथमच प्रवास करणाऱ्या त्याच्या आईबद्दल काळजी वाटत होती आणि ती सुरक्षितपणे फ्लाइटमध्ये चढली याची त्याला खात्री करायची होती.

हे ही वाचा:

उन्हाची स्थिती असेपर्यंत दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत खुल्या मैदानात कार्यक्रमास बंदी

राज्याच्या कारागृहातील कैद्यांवर असेल आता ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर

कर्नाटकातून आलेल्या शिळेतून साकारणार अयोध्येतील प्रभू श्रीराम

‘२००० कोटींचे डील’ सतावत राहणार!

 

ताहेरी अबीदिन बाजारवाला (४४) आणि त्यांची पत्नी खदिजा (३८) हे जोडपे ताहेरीच्या आईला विमानात बसविल्यानंतर विमानतळा बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना पकडले गेले, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यासोबत त्यांचा तीन वर्षांचा मुलगाही होता. पोलिसांनी या जोडप्याला बनावट ई-तिकीट बनवण्यात मदत केल्याप्रकरणी सैफ टूर्स अँड ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल एजन्सीचे मालक हुसैन दाहोद यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याने प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना त्यांची बनावट तिकिटे दाखवली आणि मध्यरात्री पावणे दोन वाजता विमानतळावर प्रवेश केला. ताहेरी बाजारवालाची आई पहिल्यांदा विमानाने प्रवास करत होती आणि त्यांना भीती वाटत होती की ती विमानात चढतांना गोंधळून जाईल, यामुळे, या दोघांनी ट्रॅव्हल एजंटची मदत घेतली ज्याने बनावट ई-तिकीटे तयार केली आणि ती जोडप्याला मेलवर पाठवली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा