30 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरक्राईमनामाभागीदाराच्याच खुनाचा कट रचल्याप्रकरणी अटक!

भागीदाराच्याच खुनाचा कट रचल्याप्रकरणी अटक!

Google News Follow

Related

दक्षिण मुंबईतील एका विकसकला भायखळा पोलिसांनी त्याच्या जुन्या भागीदाराच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी अटक केली आहे. १ मे रोजी राजू सिकंदर लिलोदिया यांच्यावर हल्ला झाला होता. सिकंदर हे हल्ल्यातून थोडक्यात बचावले होते. डॉकयार्ड रोडवरील त्यांच्या कार्यालयात तीन माणसांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला होता. सिकंदर यांच्या भावाने एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र इतर आरोपी पळून गेले होते.

सिकंदर हे नट आणि बोल्टचा व्यवसाय करत असून त्यांना बांधकाम व्यवसायात सुद्धा रस आहे. १ मे दिवशी तीन अज्ञात व्यक्ती त्यांच्या कार्यालयात शिरल्या आणि त्यांच्या जवळील लोखंडी रॉडने सिकंदर यांना मारायला सुरुवात केली. तेव्हा सिकंदर यांचा भाऊ इम्तियाज कपाडिया याने कर्मचाऱ्यांच्या मदतीने एका आरोपीला पकडून पोलोसंकडे सोपवले होते. सिकंदर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या चौकशीतून त्यांनी हिफझुर रेहमान याच्यावर संशय असल्याचे सांगितले होते. रेहमानला एका ड्रग्स प्रकरणातही अटक करण्यात आली होती. १२८ ग्रॅम चरसचे पाकीट एका सामाजिक कार्यकर्त्याच्या दुचाकीमध्ये लपवण्याचा कट त्याने रचला होता त्यासंबधीचे आरोप त्याच्यावर होते.

हे ही वाचा:

शिवसेना आमदाराच्या उपस्थितीत ‘जुलूस जबरदस्ती’

केरळमध्ये अशी झाली ‘दृश्यम’ स्टाईल हत्या

अनिल देशमुख फरार; ईडीने बजावली लूकआऊट नोटीस

गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२१मध्ये ‘गृहप्रवेश’ वाढले

सिकंदर यांच्या हल्ल्या प्रकरणी अटक केलेला आरोपी वाजिद शेख याच्यावर पोलिसांनी खून करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप लावले. पुढील चौकशी दरम्यान वाजिद याने करीम उर्फ शानू खान, सैफ शेख आणि इलियास बच्काना यांची नावे सांगितली. दोन दिवसांत पोलिसांनी खान आणि शेख यांना अटक केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा