१२ वर्षाच्या बहिणीच्या कपड्यावर रक्ताचे डाग बघून भाऊ संतापला,बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करून तिची हत्या केली. उल्हासनगर मध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, मुलीला मासिक पाळी आल्याने हा गैरसमज झाला असावा. मुलीला पहिल्यांदाच मासिक पाळी आली होती, परंतु भावाला वाटले की तिचे कोणाशी तरी शारीरिक संबंध आहे, अशी माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.
बळीत मुलगी १२ वर्षाची असून उल्हासनगर मध्ये तिचा ३० वर्षीय भाऊ आणि मेहुण्यासोबत राहत होती. काही दिवसांपूर्वी मुलीची मासिक पाळी सुरू झाली होती, प्रथमच तिला मासिक पाळी सुरू झाल्यामुळे तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग पडले होते. तिच्या भावाने बहिणीच्या कपड्यावर रक्ताचे डाग बघून बहिणीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय भावाला आला,मात्र भावाला मासिक पाळीचे ज्ञान नव्हते आणि भावाने तिला रक्ताच्या डागाबद्दल विचारले तेव्हा तीदेखील स्पष्ट करू शकली नाही.
हे ही वाचा:
धक्कादायक!! इराणमध्ये यावर्षी २०३ जणांना फासावर लटकवले!
आफताबवर खुनाचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप निश्चित; श्रद्धा वालकर हत्या
थॅलियम, आर्सेनिक देऊन पती, सासूला मारणाऱ्या महिलेला जामीन नाही
५० फुटांवरून बस कोसळून १५ प्रवाशांचा मृत्यू
बहिणीचे कोणाशी तरी शारीरिक संबंध जुळून आला असा संशय घेत भावाने तिला लाथा बुक्क्याने, स्टीलच्या चिमटयाने मारहाण केली त्यात ती गंभीर जखमी झाली. भावानेच तातडीने तिला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून भावा विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसानी दिली.