पुष्पक एक्स्प्रेस बलात्कार प्रकरणातील आठही आरोपींच्या गठड्या वळल्या!

पुष्पक एक्स्प्रेस बलात्कार प्रकरणातील आठही आरोपींच्या गठड्या वळल्या!

इगतपुरीहून कसाऱ्याच्या दिशेने येत असलेल्या लखनऊ- मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये एका टोळीने शुक्रवारी (८ ऑक्टोबर) रात्री दरोडा टाकला होता आणि एका २० वर्षीय महिलेवर बलात्कारही केला होता. या गुन्ह्यातील चार आरोपींना गुन्हा घडल्यावर लगेच पकडण्यात आले होते, तर पाचव्या आरोपीला शनिवारी (९ ऑक्टोबर) ताब्यात घेण्यात आले होते. उर्वरित तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले असून कल्याण जीआरपी पोलिसांनी आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आठ पैकी दोन दरोडेखोरांनी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे तपासातून पुढे आले आहे.

मध्य रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालीद, उपायुक्त मनोज पाटील, वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल, पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांच्या तीन पथकांनी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी तपास सुरु केला. या गुन्ह्यातील आरोपी अरशद शेख, प्रकाश पारधी उर्फ पक्या, अर्जुन परदेशी, किशोर सोनवणे उर्फ काळू, काशिनाथ तेलंग, आकाश शेनोरे, धनंजय भगत आणि राहूल आडोळे या आठही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आठ आरोपींपैकी एक आरोपी मुंबईचा आहे, तर उर्वरित सात आरोपी हे नाशिकचे आहेत. आकाश शेनोरे हा यांचा म्होरक्या आहे.

हे ही वाचा:

ठाण्यात ‘व्हाईटनर, नेलपेंट रिमूव्हर, मॅजिक मशरूम’ची नशा!

चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा अंतिम फेरीत

आरे वसाहतीत आता बिबट्यांपायी दुचाकीवरून फिरणेही मुश्कील

नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज

इगतपुरी स्थानकानंतर ट्रेन लांब बोगद्यात शिरली असता दरोडेखोरांनी अंधाराचा फायदा घेत जनरल बोगीतील प्रवाशांना बेल्ट आणि धातूच्या शस्त्रांच्या मदतीने धमकावून प्रवाशांकडील सामान त्यांना देण्यास भाग पाडले. त्यांनी प्रवाशांकडून मोबाईल, रोकड लुटली होती. पाच आरोपींना कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना आज कोर्टात हजर केले जाईल.

Exit mobile version