आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी न्यायालयात दाद मागायला येणाऱ्या प्रत्येकाचीच अपेक्षा असते. अर्थात, न्यायालयीन कामकाजाला विलंब होतच असतो. पण त्याचा अर्थ त्याचा राग न्यायालयावर काढता येत नाही. मात्र कुर्ला येथील दंडाधिकारी न्यायालयातील न्यायाधीशांना असा अनुभव आला. त्यातून मग आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कुर्ला येथील ६०व्या दंडाधिकारी न्यायालयात १ एप्रिल रोजी ही घटना घडली. ११.३० च्या दरम्यान ही घटना घडली आणि त्यासंदर्भात मग गुन्हा दाखल करण्यात आला.
नमूद तारखेला न्यायालयाचे कामकाज चालू असताना आरोपी जावेद सुभाष शेख उर्फ प्रदीप सुभाष तायडे (४०) याने त्याच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या खटल्याचा लवकरात लवकर त्याच्याप्रमाणे निकाल लावून त्याला कोर्टकचेरीतून मुक्त करण्याची मागणी केली होती. ही वारंवार मागणी करत आरडाओरडा करून त्याने महानगर दंडाधिकारी अ.अ. धुमकेकर यांना धाकदपटशा दाखवण्यासाठी त्याच्याजवळील चप्पल फेकून मारली.
हे ही वाचा:
त्याने तयार केल्या होत्या तब्बल ११९ बनावट कंपन्या, पोलिसांनी गठडी वळली
इटलीमध्ये कार्यालयीन कामकाजात आता इंग्रजी भाषेवर बंदी , नियम मोडल्यास होणार दंड
स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात यापुढे एक शब्दही सहन करणार नाही
उमेश पाल हत्येप्रकरणी अतिकचा मेहुणा पोलिसांचा पाहुणा!
त्यानंतर न्यायालयाच्या कामकाजात अडथळा आणून न्यायालयाचा अवमान केला म्हणून जावेद शेख तथा प्रदीप तायडेवर कलम गु. र. नं व कलम-110/23भा. द. वि. कलम 353, 228, 189, 506, 504 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कुर्ला पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचा इतिहास गुन्हेगारी स्वरूपाचा असून याआधी त्याने ५ वर्षांसाठी शिक्षा भोगलेली आहे.