वाहनांचे ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP)फसवणूक प्रकरणी मुंबईतील दक्षिण सायबर पोलीस ठाण्याने बंगळुरू येथून एकाला अटक केली आहे. विनोद व्यंकट बावळे (५७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विनोद बावळे याने बनावट वेबसाईट तयार करून शेकडो वाहन चालकांकडून ऑनलाईन पैसे घेवुन फसवणूक केली असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने देशभरात वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट'(HSRP) लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश आदेश जारी केल्यानंतर देशभरात २०१९ च्या नंतरच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट'(HSRP) लावण्या
साठी प्रत्येक राज्यातील सरकारने परिवहन विभागाला आदेश दिले. ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP)साठी प्रत्येक राज्याने वेगवेगळे दर लागू केले आहे.
हे ही वाचा:
एनएसएस शिबिरात हिंदू विद्यार्थ्यांना नमाज पढण्याची केली गेली सक्ती!
गुगलकडून भारतातील २९ लाख जाहिरातदारांची खाती निलंबित; कारण काय?
अमरावतीचे न्यायमूर्ती बीआर गवई होणार पुढील सरन्यायाधीश!
‘कोच, मी खेळेन’ – आणि त्या एका वाक्यानं सगळं बदललं!
महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१९ पुर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP)पाटी बसविण्याचा निर्णय घेतला असुन अशा जुन्या वाहनांना HSRP बसविण्या करिता ३ संस्थांची उत्पादकांची परिवहन विभागामार्फत निवड केलेली आहे.
त्याअनुषंगाने १ एप्रिल २०१९ पुर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) बसविण्याचे काम महाराष्ट्रात सुरु झालेले आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व संबंधित वाहन मालकांना वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर HSRP NEW-HSRP ONLINE BOOKING या टॅबमध्ये जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.
त्यामध्ये परिवहन विभागामार्फत निवड करण्यात आलेल्या ३ संस्थांची ऑनलाईन पोर्टलच्या लिंक प्रसारीत करण्यात आली आहे. नमुद ३ अधिकृत संकेतस्थळा व्यतिरिक्त हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) बसविण्यासाठी इतर बनावट लिंक सायबर गुन्हेगारांनी तयार केलेबाबत तक्रार दिल्याने सायबर पोलीस ठाणे, दक्षिण विभाग गुन्हे शाखा, मुंबई येथे गु.र.कं. १९/२०२५ कलम ३१८ (३) BNS सह ६६ (क), ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील https://indnumberplate.com बाबत तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन https://indnumberplate.com ही बनावट लिंक तयार करणारे आरोपी नामे विनोद व्यंकट बावळे, वय ५७ वर्षे, रा. घर नं.९, लक्ष्मी व्यंकटेश्वरा निलया, बंडप्पा गार्डनच्या पाठीमागे, 18A मेन क्रॉस रोड, मुथ्यालानगर माथिकेरे, बँगलोर नॉर्थ, कर्नाटक यांचा गुन्हयाच्या तपासात सहभाग निष्पन्न झाल्यामुळे त्यास सपानि रुपाली चौघरी, सपानि इशान खरोटे व स्टाफ यांनी यशवंतपुरा पोलीस ठाणे, बँगलोर, कर्नाटक येथुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे.