बोरिवली रेल्वे स्टेशनवर विनयभंग करणाऱ्या भजन गायकाला अटक

सीसीटीव्ही पाहून पोलिसांनी आरोपीला केली अटक, तरुणीशी लगट करण्याचा करत होता प्रयत्न

बोरिवली रेल्वे स्टेशनवर विनयभंग करणाऱ्या भजन गायकाला अटक

बोरिवली रेल्वे स्थानकात मित्राची वाट पाहणाऱ्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका भजन गायकाला विरार येथून अटक केली आहे. हे कृत्य त्याने नशेत केल्याची कबुली या गायकाने दिली आहे. याप्रकरणी बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गायकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाविद्यालयात शिकणाऱ्या १९ वर्षीय तरुणी ही मंगळवारी सायंकाळी आपल्या मित्राची वाट पहात बोरिवली रेल्वे स्थानकात एका बाकावर बसलेली होती. त्या दरम्यान एकव्यक्ती बाकावर तिच्या शेजारी येऊन बसली, त्याने तीला विरारला जाणारी ट्रेन कुठे येईल असा प्रश्न विचारला असता तिने हातानेच त्याला ट्रेन कुठे येईल हे सांगितले.

त्यानंतर देखील त्याने बाकावर तिला खेटून बसला व तिला स्पर्श करू लागला. तरुणी घाबरली आणि बाकवरून उठून उभी राहिली. व तेथून ती दूर जाऊ लागताच या व्यक्तीने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या तरुणीने आरडाओरडा सुरू केला आणि त्याच वेळी तिचा मित्र देखील तिकडे आला. व त्याने इतर प्रवाशांच्या मदतीने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो विरार ट्रेन पकडून पळून गेला.

हे ही वाचा:

आयुष्मान भारत आधारित स्कॅन-शेअर सेवेचा दहा लाख रुग्णांना लाभ

नामस्मरण हेच सर्वस्व सांगणारे गोंदवल्याचे श्री ‘ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज’

‘श्रीरामनवमीचे’ महत्त्व

मोदी-नेत्यानाहू यांच्यातील फरक राऊतांना कळतो तरी का?

या तरुणीने बोरिवली रेल्वे स्थानक गाठून तक्रार दाखल केली. पोलीसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही टीव्हीचा माग घेत विरार येथून या व्यक्तीला ताब्यात घेऊन बोरिवली पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव दीपक पुजारी असे असून तो भजन गायक असल्याची माहिती त्याने दिली. दारूच्या नशेत असल्यामुळे आपल्याकडून हे कृत्य घडले अशी कबुली त्याने पोलिसांना दिली.बोरिवली रेल्वे पोलिसानी विनयभंग प्रकरणी त्याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version