दोन व्यापाऱ्यांची हत्या; मृतदेह जाळून वर्धा नदीत टाकले

व्यावसायिकांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक

दोन व्यापाऱ्यांची हत्या; मृतदेह जाळून वर्धा नदीत टाकले

नागपूरमधील दोघा व्यापाऱ्यांची ५० लाखांमध्ये हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. अमरीश गोळे (४१) आणि निराला कुमार सिंग (४३) अशी या दोन व्यावसायिकांची नावे आहेत. २५ जुलै रोजी कंत्राटी मारेकऱ्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

 

दीड कोटी रुपयांची गुंतवणूक अल्पावधीत दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून या दोन व्यापाऱ्यांना कोंढाळी येथील फार्महाऊसवर नेण्यात आले. त्यांचे अर्धे जळालेले मृतदेह खारकी पुलावरून वर्धा नदीत फेकण्यात आले. गोळे यांचा कुजलेला मृतदेह गुरुवारी अमरावती ग्रामीण पोलिसांच्या तिओसा पोलिसांनी बाहेर काढला, तर सिंह यांच्या मृतदेहाची शोधमोहीम शुक्रवारी पुन्हा सुरू होणार आहे.

 

व्यावसायिकांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. व्यापाऱ्याच्या कुटुंबियांनी २५ जुलै रोजी सीताबर्डी आणि सोनेगाव पोलिस ठाण्यामध्ये दोन व्यावसायिक बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्या बेपत्ता होण्यामागे विशाल पुंजचा संबंध असल्याचा संशय आहे. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पथकाने शोध घेतला असता या हत्येचा मुख्य सूत्रधार ओंकार तलमले (२५) असल्याचे उघड झाले.

हे ही वाचा:

ट्रेन ९० मिनिटे लवकर आली अन् पाच मिनिटांत सुटली, ४५ प्रवासी राहिले मागे

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना दुप्पट मदत

ठिसूळ हाडे, ९० फ्रॅक्चर; पण अहमदाबादच्या तरुणाने घेतली आयआयटीत झेप

म्यानमारमधून आलेल्या निर्वासितांचे बायोमेट्रिक्स जमा करणार

तलमले याने प्रथम गोळे आणि सिंग यांच्याशी विशाल पुंज याच्या माध्यमातून संपर्क साधला होता. होम डेकोर आणि कलाकृतींचा व्यवसाय असल्याचा दावा करणाऱ्या तलमले यांनी गोळे आणि सिंग यांना दीड कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट द्यावा, यासाठी पटवले. त्या बदल्यात अल्पवधीतच हे पैसे दोन कोटी ८० लाख ते तीन कोटी रुपये होतील, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते.

 

मात्र त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आणि मारेकऱ्यांना त्यासाठी ५० लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हत्येचा कट लकी तुर्केल याच्या शेतात रचण्यात आला. तलमले याने हर्ष वर्मा (२२), लकी तुर्केल, हर्ष बागडे (१९) आणि दानेश शिवपेठ (२२) यांना व्यावसायिकांना मारल्यास ५० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.

Exit mobile version