मुस्लिम धर्मगुरु अटक प्रकरणी शंभरपेक्षा जास्त जणांविरुद्ध गुन्हा

गुजरातच्या जुनागढ येथे केले होते प्रक्षोभक विधान

मुस्लिम धर्मगुरु अटक प्रकरणी शंभरपेक्षा जास्त जणांविरुद्ध गुन्हा

मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती सलमान अझरीच्या अटकेला विरोध करून घाटकोपर पोलीस ठाण्याला घेराव घालणाऱ्या अंदाजे शंभरपेक्षा अधिक जणांविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आलेली असून इतरांचा शोध घेण्यात येत आहे.

सलमान सय्यद (२५),अझीम शेख (२१),
मोहम्मद साबिरलाल मोहम्मद (३२), मोहम्मद बिलाल अब्दुल रहेमान काझी (२३) आणि अब्दुल रहेमान अब्दुला काझी (६०) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत,

या पाच जणांना दगडफेक करताना अटक करण्यात आली. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, पोलिसांना मारहाण करणे, दंगल माजविणे आणि वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजरात राज्यातील जुनागड या ठिकाणी प्रक्षोभक भाषण करून दोन समुदायात जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुजरात एटीएसचे पथक मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती सलमान अझरी याला अटक करण्यासाठी रविवारी सकाळी मुंबईत दाखल झाले होते.

गुजरात एटीएसचे पथक मौलाना मुफ्तीला अटक करण्यासाठी घाटकोपरच्या अमृत नगर येथे गेले असता मुस्लिम समुदायाने त्यांच्या अटकेला विरोध दर्शविला.

काही वेळातच त्या ठिकाणी अचानक २००ते २५० जणांचा जमाव दाखल झाला आणि त्यांनी विरोध प्रदर्शन सुरू केले, मौलाना मुफ्ती याला पोलिस बंदोबस्तात घाटकोपर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असता येथील जमाव देखील पोलीस ठाण्याबाहेर गोळा झाले होते.

हे ही वाचा:

ललित कला केंद्राच्या वादात अभिनेते प्रशांत दामलेंनी लक्ष घालून तोडगा काढावा!

संसदेत मोदी गरजले अब की बार ४०० पार…!

पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळं फासल्या प्रकरणी कुणाल राऊतला अटक!

१९९१ चा उपासना कायदा रद्द करण्याची मागणी

 

या जमावाने एलबीएस मार्ग देखील रोखून धरला होता, तसेच या जमावातील काही जणांनी पोलीस ठाण्याच्या दिशेने दगडफेक केली.

अचानक आलेल्या या जमावामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती,अखेर पोलिसांची अधिक कुमक मागवून या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी केलेल्या धरपकडीत पाच जणांना रात्रीच ताब्यात घेऊन त्याच्यासह जवळपास शंभरपेक्षा अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या पाच आरोपीना सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version