25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाअवैध शस्त्र बाळगणाऱ्या ४९ जणांवर कारवाई

अवैध शस्त्र बाळगणाऱ्या ४९ जणांवर कारवाई

लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ऑपरेशन ऑल आऊट

Google News Follow

Related

लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शहरात ऑपरेशन ऑल आऊट राबवत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या ४९ जणांवर कारवाई केली आहे. तसेच, तडीपार केले असताना बेकायदेशीररित्या मुंबईत प्रवेश केलेल्या ६२ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई पोलिसांनी नजीकच्या काळातील महत्वाच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने शुक्रवारी रात्री शहरात ऑपरेशन ऑल आऊट राबविले.

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थाचे सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पाच प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, अपर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, १३ परिमंडळाचे पोलीस उप आयुक्त, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा, संरक्षण, सुरक्षा, ४१ विभागांचे सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वपोनि, पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते.

पोलिसांनी शहरात २०६ ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवत पोलीस अभिलेखावरील ९६४ आरोपी तपासले यात त्यांना २३० आरोपी सापडले. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांनी ५२९ संवेदनशिल ठिकाणांची तपासणी केली आहे. सोबतच पोलिसांनी बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सुमारे ८०० हॉटेल्स, लॉज यांची तपासणी केली आहे.

हे ही वाचा:

‘काँग्रेसला औरंगजेबाचा जिझिया कर लागू करायचा आहे’

वडेट्टीवारांची कसाबला क्लीनचीट, निकम मात्र देशद्रोही

दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या अरविंदर सिंग लवली यांच्या हाती ‘कमळ’

”गरिबांचे आशीर्वाद हेच माझे भांडवल”

ऑपरेशन ऑल आऊट पोलीसांनी अभिलेखावरील आठ पाहिजे, फरारी आरोपीना अटक केली आहे. तर, बेकायदेशीररित्या मुंबईत प्रवेश केलेल्या ६२ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अजामीनपात्र वॉरंट बजावलेल्या ५३ आरोपींवर कारवाई केली आहे. पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या ४९ कारवाई केल्या असून आरोपींजवळून चाकू, तलवारी अशी शस्त्रे जप्त केली आहेत. तर, दोन आरोपींना पिस्तूलांसह अटक केली आहे.

शहरात अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्यावर अंमलीपदार्थ विरोधी कायद्यान्वये पाच कारवाई केल्या आहेत. तर, अवैध दारू विक्री, जुगार अशा २४ ठिकाणच्या अवैध धंद्यावर छापेमारी करुन पोलिसांनी हे धंदे उध्वस्त केले आहेत. यात ३० आरोपीना अटक करण्यात आली आहे. तर, १५४ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईत संशयास्पदरित्या फिरत असलेल्या १७५ जणांवर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२०,१२२ आणि १३५ अन्वये कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी शहरात एकूण १११ ठिकाणी नाकाबंदी करत सात हजार २३३ दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी करुन यातील दोन हजार ४४० वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली आहे. यात, मद्य प्राशन करुन वाहन चालविल्याप्रकरणी ७७ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा