४५ गायींना विषारी गूळ खाऊ घातला; धर्मांतरित ख्रिश्चन असलेले चार आरोपी ताब्यात

नियमितपणे गायींची हत्या करत असल्याचे आले समोर

४५ गायींना विषारी गूळ खाऊ घातला; धर्मांतरित ख्रिश्चन असलेले चार आरोपी ताब्यात

कर्नाल म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून देखभाल केल्या जाणाऱ्या गौशालेतील ४५ गायींच्या हत्येसंदर्भात आता ४ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातून या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. फूसगर्ग गावात ही घटना घडली होती. २६ आणि २७ जानेवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली.

या चार जणांनी त्या गायींना सल्फोसचा समावेश असलेला गूळ खायला दिला. ज्याने हा कट रचला त्याने या गायींना मारून त्यांची कातडी आणि हाडे विकता येतील या उद्देशाने हे कृत्य केले.

सेल्फोस म्हणजे ऍल्युमिनियन फॉस्फाइड हे अत्यंत जालीम विष असून त्यावर कोणताही उपाय नाही. ०.५ ग्रॅम इतके प्रमाणही जीवाला घातक ठरू शकते. जगभरात या विषाचा अनेक ठिकाणी उपयोग केला जातो.

ज्या चार जणांना अटक करण्यात आले आहे त्यात विशाल कुमार (कुरुक्षेत्र), रजत कुमार (कर्नाल), सूरज कुमार (कर्नाल) आणि सोनू (अंबाला) यांचा समावेश आहे. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार हे चौघेही धर्मांतरित झालेले ख्रिश्चन होते. ते अशाच मृत झालेल्या जनावरांची कातडी, हाडे गोळा करून त्यातून पैसा कमावत असत.

हे ही वाचा:

सरकार पडण्याची कसलीही भीती वाटत नाही

पुण्यातील गुगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी

सरकार पडण्याची कसलीही भीती वाटत नाही

रेल्वेच्या ओव्हरहेड व्हॅनने आपल्याच ४ कर्मचाऱ्यांना चिरडले

एवढेच नव्हे तर हे चौघेही नियमितपणे गायींना मारून त्यांची कातडी आणि हाडे विकण्याचा उद्योग करत असत. पण सर्वसाधारणपणे ते ४-५ गायींना मारून हे कृत्य करत. यावेळी त्यांनी ४५ गायींवर विषप्रयोग केल्यामुळे त्यांचे बिंग फुटले.पोलिस निरीक्षक मोहन लाल यांनी सांगितले की, या आरोपींनी सुरेश कुमारच्या साथीने हे काम केले. सुरेश कुमारने या गायींवर विषप्रयोग केला.

भारती दंडसंहितेनुसार चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या चौघांना पोलिस रिमांडमध्ये ठेवण्याची विनंती करण्यात येणार आहे. सुरेश कुमार हा मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिस त्याच्या शोधार्थ निघाले आहेत.

उत्तर प्रदेशात गेल्यावर्षी अशीच घटना घडली होती. अमरोहा येथे विष टाकण्यात आलेला चारा खाल्ल्याने डझनावारी गायींचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version