चार महिन्यांच्या मुलीची चोरी करणारी ‘टीम’ पोलिसांच्या जाळ्यात

चार महिन्यांच्या मुलीची चोरी करणारी ‘टीम’ पोलिसांच्या जाळ्यात

दक्षिण मुंबईतून चोरीला गेलेल्या ४ महिन्यांच्या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश तर आले मात्र या मुलीची आई बेपत्ता झाल्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक आईचा शोध घेत आहे. व्ही.पी रोड पोलिसांनी ४ महिन्यांच्या मुलीची चोरी करून तिची विक्री तामिळनाडू राज्यात करणाऱ्या ११ जणांना अटक केली आहे. मात्र मुलीची चोरी झाल्याची तक्रार देणारी मुलीची आईच बेपत्ता झाल्यामुळे पोलीस देखील संभ्रमात पडले आहे. मुलीचा शोध लागला, परंतु आता मुलीच्या आईचा शोध घेण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

दक्षिण मुंबईतील व्ही.पी.रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २५ डिसेंबर रोजी ४ महिन्याची मुलगी चोरीला गेल्याची घटना घडली होती. या मुलीच्या आईनेच पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली होती. या महिलेलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणारा इब्राहिम शेख याने मुलीला तिच्या कुशीतून चोरी करून घेऊन गेल्याचे तक्रारीत म्हटले होते.

पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून अहोरात्र मेहनत करून आरोपीचा शोध घेत सायन, धारावी, मालाड, नागपाडा, तसेच कल्याण जोगेश्वरी परिसरातून इब्राहिम शेख, मोहम्मद शेरखान उर्फ शेरू पीर मोहम्मद खान, लक्ष्मी मुर्गेश, सद्दाम शाह, अमजद शेख, अमजद शेख आणि ताहीर उर्फ रेश्मा शेख या सहा जणांना अटक केली. अटक आरोपीच्या चौकशीत त्यांनी मुलीला तामिळनाडू राज्यात साडे चार लाख रुपयात विकल्याचे माहिती दिली.

पोलिसांचे एक पथक तात्काळ तामिळनाडू राज्यात दाखल झाले आणि पोलिस पथकाने तामिळनाडू येथून कार्तिक राजेंद्र, चित्रा कार्तिक, तामिळ थंगराज, मूर्ती सामी आणि आनंदकुमार नागराजन यांना अटक करून त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेल्या ४ महिन्याच्या मुलीची सुखरूप सुटका करून तिला पोलिसाना ताब्यात घेऊन मुंबईत आणले. मूळ चोरी आणि विक्री प्रकरणी पोलिसांनी अकरा जणांना अटक अली आहे. अटक आरोपीपैकी मुख्य आरोपी इब्राहिम हा स्वतःला मुलीचा पिता असल्याचे सांगत असल्यामुळे पोलिसांपुढे आणखी एका समस्या समोर उभी राहिली आहे.

हे ही वाचा:

‘सोनिया’ च्या पाऊलांनी शरद पवार आले,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनमोहन सिंग झाले

सायनावर अश्लिल टिप्पणी करूनही अभिनेता सिद्धार्थला पुरोगाम्यांचे अभय

भर बर्फात बॉलीवूड गाण्यावर सैन्याचे कदमताल

कर्ज द्यायला नकार, पेटवून दिली बँक

 

पोलिसांनी तक्रारदार महिला (मुलीची आई असल्याचे सांगणारी) अन्वरी अब्दुल रशीद शेख (५०) ही तक्रार दिल्यापासून बेपत्ता झाल्यामुळे मुलीच्या आईचे वय आणि मुलीचे वय बघता ही मुलगी तिचीच आहे कशावरून हा प्रश्न देखील पोलिसांना पडला आहे. अन्वरी ही १ जानेवारी पासून बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांना अधिकच संशय बळावला आहे. पोलिसांनी संशय दूर करण्यासाठी मुलीची आणि इब्राहिम या दोघांची डीएनए चाचणी करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे. हा सर्व गोंधळ दूर करण्यासाठी पोलीसाचे एक पथक आता अन्वरीच्या शोध कार्यात गुंतले आहे.

Exit mobile version