१३ पिस्तुल, ३६ काडतुसांसह आलेल्या ११ जणांना बेड्या

१३ पिस्तुल, ३६ काडतुसांसह आलेल्या ११ जणांना बेड्या

मुंबईत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांनी केली आहे.जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये १३ पिस्तुल, ३६ काडतुसे याचा समावेश आहे, ही शस्त्रे मुंबईत कशासाठी आणण्यात आली होती याचा तपास सुरु असल्याची माहिती एटीएसने दिली आहे.

मुंबईत काही इसम मोठ्या मोठ्या शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती एटीएस काळाचौकी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने एटीएसने मुलुंड चेक नाका येथे सापळा रचून संशयावरून काही जणांना ताब्यत घेऊन त्याची झडती घेण्यात आली.

त्यावेळी त्यांच्याजवळ फॅक्टरी मेड हाय क्वालिटीचे १३ पिस्तूल आणि ३६ जिवंत काडतुसे मिळून आली. एटीएसने ही शस्त्रे ताब्यात घेऊन ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांना काळाचौकी युनिट या ठिकाणी आणून चौकशी केली असता त्यांनी आणखी काही जणांचीं नावे सांगितले. एटीएसने कल्याण, डोंबिवली, नवीमुंबई उरण, ठाणे आणि मुंबई येथून ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

पहले हिजाब, फिर किताब…बीडमध्ये झळकले बॅनर

कांदिवलीत भाजपाने लता दीदींना वाहिली आदरांजली…

काश्मीरबाबत ‘ह्युंदाई पाकिस्तान’च्या ट्विटनंतर भारताने सुनावले…

उत्तर प्रदेशमधील शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी भाजपचा संकल्प

 

अधिक चौकशीत ही शस्त्रे त्यांनी विक्रीसाठी आणली होती व त्यातील काही शस्त्रे विकण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यापैकी काही जण सराईत गुन्हेगार असून त्याच्यवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या मोठ्या प्रमाणात हि शस्त्रे मागविण्यामागे या टोळीची काय योजना होती. मुंबईत या टोळी मोठा घातपात करायचा होता का? याबाबत चौकशी सुरु असल्याची माहिती एटीएस ने दिली आहे.

Exit mobile version