28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाकोट्यवधीच्या ड्रग्ससह अकरा जणांना अटक

कोट्यवधीच्या ड्रग्ससह अकरा जणांना अटक

मुंबईत दोन ठिकाणी कारवाई

Google News Follow

Related

मुंबईत दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत पोलिसांनी कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ससह अकरा जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. डोंगरी, मुलुंड आणि कुर्ला या ठिकाणी या कारवाई करण्यात आली आहे. डोंगरीत करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी अमली पदार्थांसह मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त करण्यात आली असून याप्रकरणात अटक करण्यात आलेला शहानुर पटेल याचे अंडरवर्ल्डशी सबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

 

गुन्हे शाखा कक्ष ६ च्या पथकाने मुलुंड पूर्व टोल नाका या ठिकाणी सापळा रचून दोन चारचाकी वाहनातून साहिल रमजान अली खान उर्फ मस्सा (२७) मोहमद अजमल कासम शेख (४५) शमसुद्दीन नियाजउद्दीन शहा (२२) इमरान अस्लम पठाण (३७), मोहमद तौसिफ शौकत अली मन्सुरी (२७),मोहमद इस्माईल सलिम सिध्दीकी (२४), सर्फराज शाबीरअली खान उर्फ गोल्डन (३६) सना शाबीर अली खान उर्फ प्रियंका अशोक कारकौर (२४) यांना अटक करून त्यांच्याजवळून ७१ लाख रुपयांचा एमडी आणि कोकेन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

 

 

या आठ जणांच्या चौकशीत कुर्ला पाईप रोड येथे राहणारा रईस अमीन कुरेशी याचे नाव समोर आले असता कक्ष ६च्या पथकाने कुर्ला येथे छापा टाकून रईस याला अटक करून त्याच्या घरातून एमडी हा अमली पदार्थ आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

 

 

मुलुंड आणि कुर्ला येथून अटक करण्यात आलेल्या ९ जणांकडून पोलिसांनी जप्त केलेले अमली पदार्थ आणि इतर साहित्य असा एकूण एक कोटी १९लाख २९ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपी विरुद्ध मुंबईसह ठाण्यात १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

दरम्यान डोंगरी पोलिसांनी डोंगरीतील चिंचबंदर क्रॉस लेन, आश्रफी मंजिल परिसरातून शहानुर पटेल (३२) याला अर्धा किलो एमडी आणि ८०ग्राम चरससह अटक करण्यात आली. पोलिसानी शहानुर याच्या घरातून अमली पदार्थांसह एक गावठी कट्टा, एक एअरगन, चार जिवंत काडतुसे,१२ पॅकेट चर्रे, १तलवार,१चाकू, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, १मॅकबुक,३ सॅमसंग कंपनीचे टॅब,२६ मोबाईल फोन, १ लॅपटॉप आणि साडेतीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

महायुती सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार

नो आयडी नो एंट्री, दारूवर बंदी; जाधवपूर विद्यापीठाची नवीन नियमावली !

मुंबईत होणार ‘मसालेदार’ परिषद

भारताकडून काहीतरी शिका, पाकिस्तानला चीनचा सल्ला!

दरम्यान शहानुरच्या चौकशीत त्याने हा अमली पदार्थ मिरा रोड मध्ये राहणाऱ्या एका नायजेरियन नागरिकांकडून विक्री करीता घेतला होता अशी माहिती समोर आल्यानंतर डोंगरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पथकाने मिरा रोड येथील चिनोय मेंशन या ठिकाणी छापा टाकून चिनॉनसी नामडी (३२) या नायजेरियन जवळून २०० ग्राम एमडी आणि १५ ग्राम कोकेन असा एकूण १३ लाख २०हजार रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अटक करण्यात आलेल्या दोघांवर यापूर्वीचे अमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल असून शहानुर हा ६ महिन्यापूर्वीच तुरुंगातून बाहेर आला असल्याची माहिती डॉ. मुंढे यांनी दिली.

 

 

शहानुर याच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यावरून शहानुर याचे अंडरवर्ल्डशी सबंध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने आम्ही तपास करीत असल्याची माहिती डोंगरी पोलीस ठाण्याचे वपोनि.राजन राणे यांनी दिली. तसेच मिरा रोड येथून अटक करण्यात आलेला नायजेरियन हा २०१७ मध्ये भारतात स्वतःवर मुंबईतील रुग्णालयात डोक्यावर शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आला होता, त्यानंतर त्याने ड्रगच्या व्यवसायात उडी घेऊन ड्रग्स तस्करीचा व्यवसाय करू लागला असल्याची माहिती राणे यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा