८० लाख रुपयांच्या बोगस नोटांसह एकाला अटक

मुंबई गुन्हे शाखा कक्ष १०च्या पथकाने केलेली कारवाई

८० लाख रुपयांच्या बोगस नोटांसह एकाला अटक

पश्चिम उपनगरातील पवई उद्यान या ठिकाणी पोलिसांनी बोगस नोटांसह ३१ वर्षीय इसमाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या इसमाकडून पोलिसानी ८० लाख रुपये किमतीच्या बोगस नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सौजन्य भूषण पाटील (३१) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सौजन्य पाटील हा मूळचा पालघर जिल्ह्यात राहणारा आहे. मुंबई गुन्हे शाखा कक्ष १०च्या पथकाने केलेल्या कारवाईत त्याला अटक करण्यात आली आहे बोगस नोटांचे पार्सल घेऊन एक व्यक्ती पवई उद्यान या ठिकाणी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष १० च्या पथकाला मिळाली होती.

हे ही वाचा:

विरोधकांनी स्वतःच्या काळातील गोष्टीच घोटाळे म्हणून दाखविल्या!

शिजानच्या मोबाईलमध्ये सापडले २५० पानी व्हाट्स एप चॅट

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका

अनिल देशमुखांच्या सुटकेनिमित्त काढण्यात येणाऱ्या बाईक रॅलीला रेड सिग्नल!

मंगळवारी दुपारी कक्ष १०च्या पथकाने पवई येथील साकीविहार रोड, या ठिकाणी साध्या वेशात सापळा रचला असता एक इसम हा पवई येथील साकीविहार रोड वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी मोटारसायकल वरून आला असता त्याच्या संशयास्पद हालचाली वरून पोलिसांनी त्याला हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असणारी बॅग तपासली असता बॅगेत ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले.

या नोटा तपासल्या असता त्या नोटा बनावट असल्याचे समोर आले. त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सौजन्य पाटील असे सांगून तो पालघर जिल्ह्यातील उमरोली येथे राहणारा असल्याचे सांगितले. पोलिसानी नोटा मोजल्या असता ८० लाख रुपयांची बोगस नोटा असल्याचे समोर आले. त्याने या नोटाचे पार्सल घेऊन एका व्यक्तीला देण्यासाठी आला असल्याची माहिती पोलिसांना दिली. जप्त करण्यात आलेल्या नोटा या कलर झेरॉक्स नोटा असून त्या खऱ्या नोटा म्हणून बाजारात वितरित करण्यात येणार होत्या, अशी माहिती समोर आली आहे.

Exit mobile version