दादर येथील कीर्ती कॉलेज परिसरात एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या दोन दरोडेखोरांना अटक करण्यात दादर पोलिसांना यश आले आहे. २४ तासाच्या आत या गुन्ह्याची उकल करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्यापैकी एक जण या महिलेचा वाहनचालक आहे.
संतोष कडव (३८)आणि किसन उर्फ कृष्णा भोवड (५२)असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहे. या दोघांना नवी मुंबईतील सानपाडा परिसरातून मंगळवारी अटक करण्यात आली आहे. संतोष कडवं हा माहीम परिसरात राहण्यास असून वृद्ध महिलेच्या वाहनावर चालक म्हणून नोकरी करीत होता. सोमवारी सायंकाळी ७० वर्षीय वृद्ध महिला घरात एकटीच असल्याचे बघून किसन उर्फ कृष्णा याने महिलेच्या घरी मिठाई घेऊन आलो असल्याचे सांगत प्रवेश मिळवला, त्यानंतर त्याने महिलेला रिव्हॉल्वरचा धक दाखवून तिला खुर्चीला बांधून ठेवले. त्यानंतर घरातील कपाटातील १२लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता.
हे ही वाचा:
बलात्कारी आसाराम बापूला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
भारतविरोधी षडयंत्राची उकल आयएमएफच्या अहवालात…
सोमय्यांनी हिंमत असेल तर समोर यावे,
मंदीचे सावट तरी विकास दर ६.५ % राहण्याचा अंदाज
दादर पोलिसांनी या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक गठीत केले. तांत्रिक विशेषज्ञ आणि खबऱ्यांच्या मदतीने या दरोडेखोरांचा माग घेत मंगळवारी या दोघांना सानपाडा येथून अटक करण्यात आली. या दोघांनी गुन्हयात वापरलेले खेळण्याचे रिव्हॉल्वर पोलिसानी जप्त केले आहे. या दरोड्याच्या गुन्हयात आणखी साथीदार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हा गुन्हा असा घडला
दादर येथील कीर्ती कॉलेज परिसरातील एका रहिवासी इमारतिच्या ८व्या मजल्यावर एकट्या राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या घरी सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ४० वयोगटातील एक अनोळखी इसम आला, त्याने निळ्या रंगांची टोपी, निळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट घातली होती. हातात मिठाईचा बॉक्स घेऊन आलेल्या या अनोळखी इसमाने ‘रायकर यांनी मिठाई पाठवली आहे, असे बोलून वृद्ध महिलेच्या घरात बळजबरीने प्रवेश केला.
वृद्ध महिलेला बचावाची संधी न देता त्याने कमरेला लावलेली रिव्हॉल्वर काढून महिलेच्या मानेवर लावली आणि तिला बेडरूममध्ये आणून तिथे असलेल्या कपाटातील सोन्याचे दागिन्यांसह एकूण १२ लाखांचा ऐवज लुटून पळ काढला. या प्रकरणी या वृद्धेने शेजाऱ्यांच्या मदतीने या दरोड्याची माहिती पोलिसांना दिली होती.