पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाडा तालुक्यातील जमीन बिगरशेतीची करण्यासाठी लाच मागणाऱ्या दोघांना अटक केली आहे. या दोघांनी लाच म्हणून चक्क दारूची मोठी बाटलीच मागितली होती. शिवाय १० हजारांची मागणीही करण्यात आली.
तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला होता. त्यांच्या तक्रारीची दखल घेत विजय लक्ष्मण धुरी (५३) वनपाल नेहरोली परिमंडळ ता.वाडा (वर्ग ३) आणि विष्णु पोपट सांगळे (55) वर्षे वनपाल, बाणगंगा परिमंडळ, ता. वाडा जि. पालघर ( वर्ग ३) यांना अटक करण्यात आले आहे. या दोघांनी १० हजार रुपये इतकी लाचेची मागणी केली तसेत दारूची मोठी बाटलीही दिली.
लाचलुचपत विभागाने कारवाई केल्यावर दारुची मोठी बाटली आणि स्वीकारलेल्यापैकी काही रक्कम जमा करण्यात आली. लाचेचे कारण यातील तक्रारदार हे एका बांधकाम व्यावसायिकाकडे मॅनेजर म्हणून काम करत असुन त्यांचे एक प्रकरण वनविभाग वाडा येथे एन. ए. करिता ना हरकत दाखला मिळण्यासंदर्भात होते. सदर प्रकरणात पंचनामा करण्याचा मोबदला म्हणून यातील आलोसे क्र. १ यांनी रु. १० हजार रु. व एक राॅयल स्टॅग दारूची बाटली याची तक्रारदार यांचेकडून मागणी करण्यात आली. लाचेची मागणी करुन दारुचा खंबा तात्काळ आणुन देण्यास सांगीतले. सदर लाचेच्या मागणीस आलोसे क्र. २ यांनी प्रोत्साहन दिले.
त्यावरुन लाचेचा सापळा रचून कारवाई केली असता आलोसे क्र १ यांनी वनविभाग वाडा येथील शासकीय कार्यालयात एक दारुचा खंबा स्वीकारला असता आलोसे क्र.१ व २ यांना रंगेहाथ पकडण्यात आले असुन त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या पथकात नवनाथ जगताप,पोलीस उपअधीक्षक, पोहवा/ अमित चव्हाण,विलास भोये, निशा मांजरेकर, नवनाथ भगत, दिपक सुमडा,पोना/स्वाती तारवी, मार्गदर्शन अधिकारी सुनिल लोखंडे, पोलिस अधीक्षक, ला.प्र. वि. ठाणे परिक्षेत्र, अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि., ठाणे परिक्षेत्र यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
पालघर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर
दुरध्वनी 02525-297297
पोलीस उप अधीक्षक नवनाथ जगताप
मो.नं. 9923346810/ 9850158810
पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास
मो.नं. 8007290944/ 9405722011
@ टोल फ्रि क्रं. 1064