तेलंगणा पोलिसांनी निजामाबाद जिल्ह्यातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या कट्टरपंथी संघटनेच्या तीन नेत्यांना अटक केली आहे. कराटेच्या प्रचाराच्या नावाखाली मुस्लीम तरुणांना शस्त्रे वापरण्याचे आणि हल्ल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी हे तीन जण शिबिरे चालवत होते.
निजामाबादचे पोलिस आयुक्त के आर नागराजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयच्या तीन कट्टरवाद्यांकडून अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. ही शस्त्रे प्रशिक्षण शिबिरांमध्ये वापरली जात होती. या शिबिरांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना विशिष्ट समुदायावर हल्ला करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. अटक केलेल्यांचे आणखी ३० साथीदारही सापडले असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वांना लवकरच अटक करण्यात येईल. या कट्टरवाद्यांचे जुने गुन्हेगारी रेकॉर्डही तपासले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हे तीन मुस्लीम बहुल भागात ठिकठिकाणी अशी कराटे शिबिरे आयोजित करतात. या शिबिरांमध्ये त्या भागात राहणाऱ्या मुस्लिम तरुणांना मोठ्या संख्येने बोलावून त्यांना कराटे आणि शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. इतर समाजावर हल्ले करून कसे वर्चस्व गाजवायचे हेही त्यांना शिकवले जाते, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. या शिबिरांमध्ये थेट हिंदूंना लक्ष्य करून हल्ल्याचे प्रशिक्षण दिले जाते. पण अशा काही लोकांना धडा शिकवण्यासाठी या शिबिरांमध्ये प्रशिक्षण दिले जाते, जे इस्लामवर प्रश्नचिन्ह लावतात किंवा पैगंबराबद्दल काही बोलतात. अशी शिबिरे आयोजित करण्यासाठी पीएफआयने मोठे नेटवर्क तयार केले असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
पवईतील हिरानंदानी मॉलमध्ये भीषण आग
महाराष्ट्रासारखा राजकीय भूकंप इंग्लंडमध्ये, जॉन्सन सरकारमधील ३९ मंत्र्यांचा राजीनामा
शिवसेनेला खिंडार; ठाण्याचे ६६ माजी नगरसेवक मुख्यमंत्री शिंदेंच्या बाजूने
नवलानी प्रकरणी संजय राऊतांना दणका; किरीट सोमय्यांना दिलासा
पीएफआयच्या या मोहिमेचा नेता अब्दुल कादिर असून तो ५२ वर्षाचा आहे. तो मुस्लिम भागातील तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना या छावण्यांमध्ये आणायचा आणि प्रशिक्षण देऊन हल्ले करायला सांगायचे. त्याला मंगळवार, ५ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यांनतर बुधवारी अटक करण्यात आलेल्या तीन जणांकडून साहित्यही जप्त करण्यात आले आहे. ही बाब समोर आल्यानंतर पीएफआयच्या कारवायांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.