फकिराच्या वेशात दागिने लुबाडणाऱ्याला पकडले

फकिराच्या वेशात दागिने लुबाडणाऱ्याला पकडले

ईडा पीडा दूर करण्याच्या नावाखाली एका गृहिणीचे सोन्याचे दागिने घेऊन पळून गेलेल्या फकिराला विनोबा भावे नगर पोलिसांनी अंबरनाथ येथून अटक केली आहे.

बजरंग व्यंकटराव भांडे (३१) असे अटक करण्यात आलेल्या फकिराचे नाव आहे. अंबरनाथ येथे राहणारा हा फकीर मुंबईतीच चाळीवजा घरामध्ये दुपारच्या सुमारास फकीर बनून जात असे व एकट्या दुकट्या गृहिणींना बोलबच्चनगिरी करून दागिन्यांवर दुवा मारून देतो म्हणजे घरात लक्ष्मी नांदेल, असे सांगून हातचलाखीने दागिन्यांसह पोबारा करीत होता. कुर्ला पश्चिम येथे राजू बेडेकर मार्ग या ठिकाणी राहणाऱ्या एका ३० वर्षीय गृहणीला त्याने अश्याच पद्धतीने फसवणून तिचे दागिने घेऊन पोबारा केला होता.

हे ही वाचा:

पालिकेपेक्षा खासगी लसीकरण सुदृढ अवस्थेत

एकनाथ खडसेंच्या जावयाची कोठडी वाढली

पाळत आणि भातुकलीचा खेळ!

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काँग्रेसवर पाळत ठेवतात?

याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार, पोनी. पंकज धाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तायडे, जितेंद्र सपकाळे, पोलिस हवालदार रमेश सिंग, चंद्रकांत पवार, संदीप पाटील आणि गणेश काळे या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या भामट्याचा शोध घेऊन त्याला अंबरनाथ येथील शिवाजी नगर येथून अटक केली आहे.

Exit mobile version