केळ्याने होत आहे रे! केळे विक्रेत्यामुळे लागला रिक्षा चोराचा शोध

केळ्याने होत आहे रे! केळे विक्रेत्यामुळे लागला रिक्षा चोराचा शोध

रिक्षा चोरी करणाऱ्या चोराने केळेवाल्याच्या मोबाईल फोन वरून भाच्याला फोन केला होता, हाच तपासाचा धागा पकडून नवघर पोलिसानी रिक्षा चोराचा शोध घेऊन नालासोपारा येथून त्याच्या मुसक्या आवळून त्याला अटक करण्यात आली.

समीर कामलकांत शेख उर्फ विजय कामलकांत मिश्रा (३७) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चोराचे नाव आहे. भांडुप पूर्वेतील दत्तनगर येथे राहणाऱ्या समीर शेख उर्फ विजय मिश्रा याने १ जून रोजी रात्रीच्या सुमारास मुलुंड पूर्व सावरकर रोड वर शिवकुमार पटेल याची पार्क केलेली रिक्षा चोरी करून घेऊन गेला होता. नवघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास अधिकारी पो.उ.नि सानप आणि त्याच्या पथकातील पोलीस अंमलदार चव्हाण, आंबरे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित इसम रिक्षा चोरी करून घेऊन जाताना दिसून आला. या फुटेजच्या आधारे तपास पथकाने मुलुंड परिसरात त्याचा शोध घेत असताना त्याचे फुटेज एका केळी विक्रेत्याला दाखवले असता त्याने हा इसम संशयास्पदरित्या फिरत होता, व त्या इसमाने केळे वाल्याच्या मोबाईल फोनवरून कुणाला तरी फोन केला असल्याची माहिती केळेवाल्याने पोलिसांना दिली.

हे ही वाचा:

अभाविप, राष्ट्रवादाचा हुंकार! युवशक्तीचा जागर!!

मूसेवाला हत्येप्रकरणी पुण्यातील दोघांच्या मुसक्या आवळल्या

२००६ वाराणसी साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला फाशी

‘ठाकरे सरकारमधील मंत्री टक्केवारी मागतात’

 

तपास पथकाने केळी विक्रेत्याच्या मोबाईल फोन मधून संशयित मोबाईल क्रमांक काढून त्या अनुषंगाने तपास सुरू केला.सदर मोबाईल क्रमांक धारकास तपास अधिकारी सानप यांनी त्याला कॉल केलेल्या इसमाबाबत विचारणा केली असता सदर इसम उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर सानप व पथकाने सदर इसमास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याला कॉल करणारा इसम हा त्याचा काका असल्याचे सांगन तो नालासोपारा परिसरात असण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

तपास पथकाने नालासोपारा परिसरात सापळा रचून समीर कामलकांत शेख उर्फ विजय कामलकांत मिश्रा याला अटक करण्यात आली.

Exit mobile version