25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामा२००५ मध्ये खंडणी मागितली, अटक झाली २०२३मध्ये

२००५ मध्ये खंडणी मागितली, अटक झाली २०२३मध्ये

बिल्डरकडे मागितली होती खंडणी आणि दिली होती मारण्याची धमकी

Google News Follow

Related

एखाद्याने गुन्हा केला तर त्याला अटक करण्यासाठी काही काळ नक्कीच लागू शकतो. पण एका प्रकरणात तब्बल १८ वर्षानंतर त्या व्यक्तीला अटक केली गेली.

बांधकाम व्यवसायिकाला २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबईतील टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला अठरा वर्षानंतर मुंबई विमानतळावरून सीबीआयने अटक केली आहे. सिंगापूर येथून मुंबई विमानतळावर उतरलेल्या या आरोपीच्या मुसक्या सीबीआयने आवळल्या असून त्याला मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सीबीआयने महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून एप्रिल २०१६ रोजी तात्काळ गुन्हा नोंदवला होता. संघटित गुन्हेगारीशी संबंधित आरोपीने २० लाखाची खंडणी घेतल्याच्या आरोपावरून हा गुन्हा सुरुवातीला टिळक नगर पोलीस ठाण्यात २००५ साली दाखल करण्यात आला होता. तक्रारदाराकडून २० लाख आणि आणखी एक लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता. टिळक नगर, नायडू कॉलनी, घाटकोपर आणि मुंबईतील इतर भागात जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम करणाऱ्या विकासकाकडून आरोपी आणि त्यांचे सहकारी मोठ्या रकमेची उधळपट्टी करत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. गुन्हे शाखेने ११ आरोपींविरुद्ध आरोपपत्र आणि दोन पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते.

बुधवारी मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आलेला आरोपी २००५ पासून फरार होता. त्याच्याविरुद्ध २०१२ मध्ये इंटरपोल मार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर, या फरार आरोपीच्या प्रत्यार्पणाची विनंती परराष्ट्र मंत्रालयामार्फत सिंगापूरला पाठवण्यात आली होती. पुढील तपासादरम्यान सीबीआयने तीन आरोपींविरुद्ध मुंबई येथील नियुक्त न्यायालयासमोर पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते.

हे ही वाचा:

ई-बाजारपेठेत ‘गर्दी’चा उच्चांक; २ लाख कोटींचे झाले व्यवहार

आर्थिक मदतीसाठी येमेनमध्ये झाली तुफान चेंगराचेंगरी; ८० पेक्षा जास्त लोक ठार

अदानीविरोधकांना हादरा, गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

हिंदू धर्म, गाय, देवीदेवतांवरून ब्रिटनच्या शाळांत हिंदू विद्यार्थ्यांचा छळ, अपमान

या फरार आरोपीने ट्रायल कोर्टासमोर आत्मसमर्पण करण्यासाठी सक्षम न्यायालयासमोर अर्ज दाखल केला होता. सिंगापूरहून मुंबई विमानतळावर उतरताना फरार आरोपीला ब्युरो ऑफ इमिग्रेशन विभाग, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई यांनी सुरक्षित केले आणि त्यानंतर इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला सीबीआयच्या ताब्यात दिले. अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला २ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा