जे.जे.रुग्णालयात १५ वर्षीय रुग्ण मुलीचा विनयभंग

सफाई कर्मचाऱ्याला अटक

जे.जे.रुग्णालयात १५ वर्षीय रुग्ण मुलीचा विनयभंग

मुंबईतील सर.जे.जे.रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या १५ वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी जे.जे.मार्ग पोलिसांनी याप्रकरणी सफाई कर्मचाऱ्या विरुद्ध विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

 

 

मानखुर्द येथे राहणारी पीडित तरुणीने वडिलांच्या मानसिक आजाराच्या गोळ्या खाल्यामुळे तीला उपचारासाठी जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असून तिच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून तिच्यासोबत तीची आई आहे.

 

 

रविवारी दुपारी रुग्णालयातील सफाई कर्मचारी रोहिदास सोळंकी (४०)हा बेड पीडित मुलीचे अंथरूण बदलण्यासाठी तिच्या बेडकडे आला होता, त्यावेळी त्याने पीडित मुलीच्या आईला मुलीचे डायपर फेकण्यासाठी पाठवले. पीडित मुलीची आई डायपर फेकण्यासाठी जाताच सफाई कर्मचारी रोहिदास सोळंखी याने पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केला.

हे ही वाचा:

इस्रायलमधून नवऱ्याशी बोलताना अचानक कॉल कट आणि….

घर चालवल्याप्रमाणे शरद पवार पक्ष चालवत होते!

ब्लॉगरचा दावा; चिनी एजंट्ने केली हरदीपसिंग निज्जरची हत्या

सॉफ्टवेअर हॅक करून लुटलेल्या २५ कोटींच्या गुन्ह्याची उकल करताना आढळला १६ हजार कोटींचा घोटाळा

 

ही बाब पीडित मुलीने तपासण्यासाठी आलेल्या डॉक्टर यांच्या लक्षात आणून दिली, हा प्रकार मुलीच्या आईला कळताच तिने जे जे मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी सफाई कर्मचारी रोहिदास सोळंखी याच्या विरुद्ध विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version