डंपरने वाशी टोलनाक्याजवळ ९ वाहनांना दिली धडक

चालक गेला पळून, क्लिनरला घेतले ताब्यात

डंपरने वाशी टोलनाक्याजवळ ९ वाहनांना दिली धडक

मुंबईहुन डेब्रिज घेऊन नवी मुंबईत येणाऱ्या डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर डंपरने ९ वाहनांना धडक दिल्याची घटना रविवारी सायंकाळी वाशी खाडी पुलावर टोल नाक्याजवळ घडली.

या अपघातात ९ वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून यात ३ जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर डंपर चालक पळून गेला असून वाशी पोलिसांनी डंपरसह क्लिनरला ताब्यात घेतले आहे. या अपघातातील डंपरचे स्टेअरींग फेल झाल्यामुळे सदर डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याचे बोलले जात आहे.

या अपघातातील डंपर एमएच-46एएफ-6694 रविवारी सांयकाळी मुंबईहुन डेब्रिज घेऊन नवी मुंबईत येत होता. सदर डंपर वाशी खाडी पुलावर टोलनाक्याच्या अलिकडे आल्यानंतर सदर डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे सदर डंपर आपल्या पुढे असलेल्या सर्व वाहनांना धडक देत पुढे गेला. त्यानंतर या डंपरने रस्त्याच्या बाजुला असलेल्या दुचाकीला जोरात धडक देऊन एलएन्डटी कंपनीच्या पत्र्यांना धडकुन थांबला. त्यानंतर डंपर चालकाने पलायन केले. या अपघातात, दुचाकीवरील दोघेजण अडकुन पडले होते. त्या दोघांना वाहतुक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. मात्र त्या दोघांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे.

हे ही वाचा:

‘धन्यवाद मोदीजी’ मोहिमेच्या माध्यमातून एवढी पत्रं पाठवली जाणार

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मुख्यमंत्री अशोक गेहलोत बॅकफूटवर?

पीएफआयवर ठाकरेंचा मौन राग….

भारतात महिला ‘बॉस’ची संख्या वाढली

 

सीसीटीव्हीमध्ये या अपघाताचे दृश्य कैद झाले आहे. त्यात हा चालक टोलनाक्याजवळ येताच त्याचे नियंत्रण सुटल्याचे दिसते. मग तो समोर रांगेत उभ्या असलेल्या वाहनांना धडक देत पुढे गेला आणि ९ वाहनांना ठोकल्यानंतर पुढे तो थांबला. तोपर्यंत या सर्व गाड्यांचे मोठे नुकसान झाले.

Exit mobile version