24.6 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरक्राईमनामा...आणि पोलीस ठाण्याचे बँक खाते बँक कर्मचाऱ्यानेच केले साफ

…आणि पोलीस ठाण्याचे बँक खाते बँक कर्मचाऱ्यानेच केले साफ

Google News Follow

Related

गुन्ह्यातील जप्त केलेली रोख रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी उघडलेल्या पोलीस ठाण्याच्या बँक खात्यातील लाखो रुपयावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील नवघर पोलीस ठाण्यात उघडकीस आला. याप्रकरणी नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून बँकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने मुंबईतील पोलीस ठाण्याचे बँक खाते देखील सुरक्षित नसल्याची चर्चा होत असून या घटनेनंतर मुंबईतील सर्व पोलीस ठाण्याचे बँक खाते तपासले जात आहे.

 

विनोद सिंग असे अटक करण्यात आलेल्या बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे, विनोद सिंग हा कल्याण येथे राहण्यास असून तो मुलुंड पूर्व येथील बँक ऑफ बडोदा या बँकेत कंत्राटी नोकर म्हणून कामाला होता. तेथून त्याची बदली दुसऱ्या ब्रान्चला झाली होती. नवघर पोलीस ठाण्याचे २००३ मध्ये देना बँकेत खाते उघडण्यात आले होते, देना बँक ही बँक ऑफ बडोदा मध्ये समाविष्ट झाली आहे. नवघर पोलीस ठाण्याच्या बँक खाते उघडण्यात आले त्यावेळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल.डी. खरपडे या खात्यात २००३ मध्ये फसवणूक, बोगस दस्तावेज प्रकरणातील गुन्ह्यातील आरोपीकडून जप्त केलेली १६ लाख ८०हजार २७२ रुपयांची रोकड बँक खात्यावर जमा करण्यात आली होती.

 

 

२००३ ते २०२२ या कालावधीत या पोलीस ठाण्यात ९ वरिष्ठ पोलीस निरीक्षक होऊन गेले, परंतु या ९ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकानी हे खाते स्वतःच्या अधिकारात घेण्याची तसदी घेतलेली नाही, त्यामुळे हे खात्यावर २००३मध्ये असलेले तत्कालीन वपोनि. खरपडे यांचेच नाव अद्याप ही बँक खात्यावर आहे. नवघर पोलीस ठाण्याचे सेफ मुद्देमाल हवालदार राणे यांनी गेल्या वर्षी जून महिण्यात बँकेतील खात्याचा तपशील तपासला असता बँक खात्यात ३२ लाख रक्कम व्याजासहित जमा असल्याचे कळले.

हे ही वाचा:

राज्यातील साडेतीन लाख युवक-युवतींना मिळणार ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ !

लाखो वारकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण

एक शहाणे, बारा उताणे

विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मोदींशी भेट…भारताच्या उज्ज्वल भवितव्याची दिली ग्वाही

 

दरम्यान, नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाचे पदभार स्वीकारणारे नवीन अधिकारी गिरप यांनी या बँक खात्याची माहिती घेण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर मुद्देमाल हवालदार राणे यांनी १७ जून २०२३ रोजी बँकेत जाऊन खात्याची माहिती घेतली असता बँकेने दिलेल्या बँक स्टेटमेंट मध्ये नवघर पोलीस ठाण्याच्या खात्यावर केवळ ३२रुपये शिल्लक असल्याची आढळून आले. हवालदार राणे यांनी पुन्हा एकदा खाते तपासले असता खात्यावर असलेल्या ३२ लाख ऐवजी केवळ ३२रुपयांची शिल्लक असल्याचे समोर आले. राणे यांनी याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. एका वर्षात नवघर पोलीस ठाण्याच्या खात्यातून ३२ लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती. नवघर पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक आणि बोगस दस्तावेज प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता तत्कालीन वपोनि. खरपडे यांच्या नावाचा वापर करून त्यांच्या नावाने कागदपत्रे तयार करण्यात आले व धनादेशद्वारे १२ मे २०२३रोजी ५लाख १०हजार रुपये रोकड काढली होती, त्यानंतर नेट बँकिंगच्या द्वारे काही रक्कम दुसऱ्या खात्यावर वळती करण्यात आली होती.

 

 

तपास पथकाने तांत्रिक तपासावरून आरोपीचा शोध घेतला असता विनोद सिंग असे नाव तपासात समोर आले.
विनोद सिंग हा बँकेंचा कंत्राटी कर्मचारी असल्याचे समोर आले, व सद्या त्याची बदली दुसऱ्या शाखेत करण्यात आली असून तो कल्याण येथे राहण्यास असल्याची माहिती तपासात समोर आली. नवघर पोलिसांनी तात्काळ कल्याण येथून विनोद सिंग याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा