24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाअमली पदार्थ विरोधी मोहिमेत पाच दिवसांत २०६ जणांना अटक

अमली पदार्थ विरोधी मोहिमेत पाच दिवसांत २०६ जणांना अटक

मेफेड्रोन, गांजा, चरस, हेरॉईन जप्त

Google News Follow

Related

मुंबई पोलिसांनी गेल्या पाच दिवसांत राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरणांमध्ये तब्बल २०६ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी या लोकांना एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४,२७६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादन कायद्यांतर्गत अंतर्गत केलेल्या कारवाईत पोलिसांनी किमान ८६६ विनापरवाना तंबाखूची दुकाने उद्ध्वस्त केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शहर पोलिसांनी या आठवड्याच्या सुरुवातीला अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू केली आहे. येत्या काही दिवसांत ही कारवाई सुरूच राहणार आहे. गेल्या पाच दिवसांत एनडीपीएस कायद्यांतर्गत १६१ गुन्ह्यांमध्ये २०६जणांना अटक करण्यात आली असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या २४ तासांत किमान ४८ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मेफेड्रोन, गांजा, चरस, हेरॉईन यासारख्या ड्रग्जसह इतर प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या २४ तासांत सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादन कायदा अंतर्गत तब्बल ८८१ प्रकरणे नोंदवण्यात आली आणि२४१ अवैध तंबाखूची दुकाने पाडण्यात आली अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हे ही वाचा:

गाढवाशी वाद, अर्थात मालवणी वस्त्रहरण

दोन महिलांच्या भांडणानंतर गोळीबार, एका महिलेने गमावला जीव

दंतेवाड्यात दोन महिने आधीच पेरण्यात आली होती स्फोटके !

शंभरीतली ‘मन की बात’आणि मोदींना दिलेल्या ९१ शिव्या

ज्या पान विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यात मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाल्याचाही समावेश आहे. शहर नशामुक्त करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे . अमली पदार्थ विक्रेत्यांनी छोट्या पान दुकानांमधूनही आपले जाळे पसरवले असल्याने अशा पान विक्रेत्यांवरही कारवाई केली जात आहे असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा