ठाण्यातील मोबाईल आणि वाहन चोरींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रेल्वे स्थानक, वर्दळीची ठिकाणे आणि बस स्थाकांवरील गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करण्यासाठी चोरांच्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. मोबाईल चोरांसोबातच वाहन चोरी करणाऱ्या चोरांच्या टोळ्यांनीही शहरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ठाण्यात दररोज १५ ते २० मोबाईल आणि १० ते १२ दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना दर दिवशी घडत आहेत.
गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गर्दीचा फायदा घेत हे चोरटे आपला हेतू साध्य करतात. गेल्या दोन आठवड्यांच्या आकडेवारीनुसार ठाणे शहरातून चोरांनी ३३ मोबाईल लंपास केले आहेत. मोबाईल चोरीसोबतच ठाण्यात दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. दिवसाला १० ते १२ दुचाकींची चोरी झाल्याची तक्रार नोंद होतेच. या चोरांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, गस्त वाढवली असे सर्व शक्य उपाय केले, पण तरीही चोरट्यांना आळा बसलेला नाही.
हे ही वाचा:
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे तिसरे पुण्यस्मरण
जलतरण तलाव कधी होणार ‘कोरोनामुक्त’?
मुलीला डोळा मारणारा गेला चार वर्षांसाठी तुरुंगात
चीनला तालिबानशी ‘मैत्री’ची आशा
ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत आता घरफोडीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाही घरफोडी करण्याइतपत चोरांची मजल गेली आहे. घरफोडी आणि चोऱ्या करणारे चोरटे हे बहुतांश वेळा पकडले जात नाहीत अशावेळी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. वर्षभरातील असे ५७० चोरीच्या गुन्ह्यातील अज्ञात चोरटे हे अजूनही अज्ञातच आहेत. चोऱ्या आणि घरफोडीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन पोलिसांनी नागरिकांना पुरेशी काळजी घेऊन सावध राहण्याबाबत आवाहन केले आहे.