24 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरक्राईमनामाकीर्तनकार प्रकरणी नागरिकांच्या रोषानंतर पोलिसांचा माफीनामा

कीर्तनकार प्रकरणी नागरिकांच्या रोषानंतर पोलिसांचा माफीनामा

Google News Follow

Related

राज्यात सध्या भोंगा प्रकरण तापलेले असताना जळगावमध्ये सुरू असलेल्या कीर्तनादरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस निरीक्षकांनी सुरू असलेले कीर्तन थांबवण्यासाठी थेट स्टेजवर जाऊन कीर्तन थांबवण्याचा प्रयत्न केला. बूट घालून पोलीस निरीक्षक स्टेजवर पोहचले असून त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भावनांचा अपमान केल्याचे वारकरी संप्रदायाने म्हटले आहे.

जळगावमधील चाळीसगावात सप्तशृंगीच्या मंदिराजवळ रात्रीच्या वेळी माइक आणि स्पीकर लाऊन कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता. यावेळी शहर पोलीस निरीक्षक के. के. पाटील हे त्या भागात पोहचले असता रात्री १० नंतर लाऊडस्पीकर बंद करावा असा नियम असल्याने ते कार्यक्रम ठिकाणी पोहचले. त्यावेळी ते थेट बूट घालून स्टेजवर चढले. कीर्तनकार महाराज ज्या नारदीय गादीवर उभे होते तिथे ते बूट घालून उभे राहिले आणि माइक बंद केला.

वारकरी संप्रदायात महाराज ज्या गादीवर उभे राहतात त्या गादीला खूप महत्त्व असते. पोलिसांच्या कारवाईला विरोध नसून त्यांनी ज्या पद्धतीने थांबवले ते अपमानास्पद असल्याचे वारकरी संप्रदायाचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे पंतप्रधान येताच ‘चोर चोर’च्या घोषणा

शूजमधून सोनं लपवून तस्करी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

संगमनेरमध्ये कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक

शिवसेना खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप

नारदेच्या गादीचा मान छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवला. पण आजचं प्रशासन हे कोणाच्यातरी भावनेला बळी पडून गादीचा अपमान करत आहे. त्यामुळे या घटनेचा संपूर्ण वारकारी संप्रदायाच्या वतीने निषेध करत असल्याचे कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर जवळेकर यांनी सांगितले. या सर्व प्रकरणानंतर पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे. नारदेच्या गादीचे महत्त्व माहित नव्हते त्यामुळे अनावधानाने ही चूक झाल्याचे पाटील यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा