नालासोपारा येथे पोलिसांनी ड्रग्ज विरोधी मोठी कारवाई केली आहे. एका नायजेरीन महिलेला या प्रकरणात अटक करण्यात आली असून तिच्याकडे दोन कोटी किंमतीचे मेफेड्रोन (MD) सापडल्याची माहिती समोर आली आहे. एडिका जोसेफ (वय ३० वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या नायजेरियन महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याकडून एक किलो मफेड्रोन जप्त केले आहे. तुळींज पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक नायजेरियन महिला नालासोपारा पूर्व प्रगती नगर, रेल्वे रुळाजवळ अमली पदार्थाची डिलिव्हरी करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर तातडीने तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी या माहितीच्या आधारे पथक तयार करून साध्या वेशात सापळा रचला. घटनास्थळी एक नायजेरीन महिला खांद्यावर बॅग लटकवून रुळाजवळ येताना दिसताच साध्या वेशातील महिला पोलिसांनी तिला लगेचच ताब्यात घेतले. यानंतर तिच्याजवळील बॅगेची झडती घेतली असता बॅगेत एक किलो मफेड्रोन हा अमली पदार्थ आढळून आला.
दरम्यान, पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता ती उडवा उडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेत तुळींज पोलीस ठाण्यात आणले. तिची कसून चौकशी केली आली असता तिने तिचे नाव एडिका जोसेफ असे असल्याचे सांगितले. तसेच एमडी या अमली पदार्थाची डीलव्हरी देण्यासाठी आली होती, अशी माहिती समोर आली. पोलिसांनी तिच्याकडे पासपोर्ट आणि व्हिसाची मागणी केली असता ती पर्यटन व्हिसावर भारतात आली होती आणि तिच्या व्हिसाची कालावधी संपलेली असून ती बेकायदेशीर भारतात वास्तव्य करत होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
हे ही वाचा:
अराजकतेच्या गर्तेत सापडलेला बांगलादेश आता आर्थिक संकटाच्या छायेत!
भाजपाने त्रिपुुरातील ग्राम पंचायती, जिल्हा परिषदांत काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टीचा सुपडा साफ केला!
वर्सोवा चौपाटीवर झोपलेल्याच्या अंगावरून गेली गाडी; दोघांना अटक
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या लोगोत शिवरायांची प्रतिमा !
तुळींज पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिच्याकडून जप्त करण्यात आलेला मफेड्रोन या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २ कोटी किंमत असल्याची माहिती आहे. तसेच एडिका जोसेफ ही एका मोठ्या ‘ड्रग्स सिंडिकेट’साठी काम करीत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले.