सापाशी खेळता खेळता तरुणाचा खेळ खल्लास

सापाशी खेळता खेळता तरुणाचा खेळ खल्लास

मुंब्रा येथील एका तरुणाने विषारी सापाशी खेळण्याचा प्रयत्न केला. हा तरुण नशेत होता. पण सापाशी खेळल्यानंतर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागले.

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे विषारी सापासोबत खेळणे एका तरुणाच्या जिवावर बेतले, सापासोबत खेळत असतांना सापाने तरुणाच्या हातावर दंश केल्यामुळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी उघडकीस आलेल्या या घटनेत या तरुणाने नशा केल्याचे समोर आले.

मोहम्मद शेख (२६) असे सापाच्या दंशाने मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. मोहम्मद हा मुंब्र्यातील संजय नगर परिसरात राहण्यास होता. साप चावलेल्या तरुणाचे नाव असून त्याला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणतानाच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. मोहम्मद शेख हा सोमवारी मुंब्रा बायपासवरील लालकिल्ला ढाब्याजवळ बसलेला असताना त्याला साप दिसला. नशेत असलेल्या मोहम्मद याने त्या सापाला पकडले व त्याच्यासोबत खेळू लागला, खेळता खेळता त्याने सापाचे तोंड बोटांच्या चिमटीत पकडून सापाला गळ्याभोवती गुंडाळून मुंब्र्यातील गावदेवी मार्केट परिसरात फिरत होता, अनेकांनी त्याला हटकले व सापाला सोडून देण्यास सांगितले, मात्र मोहम्मद त्यांनाच घाबरवू लागला होता, मोहम्मदचे मित्र हे सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत होते.

हे ही वाचा:

भारताचे ‘भूत’ काढणार ‘साहेबांचा’ धूर

पोलिसांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांसाठी आता ‘ही’ समिती

म्हाडाच्या घराचे विजेतेच गायब झालेत!

देवेंद्र फडणवीसांनी पुसले पूरग्रस्तांचे अश्रु

खेळता खेळता मोहम्मद याची सापावरील पकड सैल होताच सापाने तीन वेळा त्याच्या हाताला दंश केला, नशेत असल्यामुळे मोहम्मदला त्याची काहीच जाणीव झाली नाही. काही वेळाने त्याने सापाला एका झुडपात सोडून दिले याच दरम्यान मोहम्मदच्या अंगात विष भिनल्याने त्याला हळूहळू त्रास होऊ लागला होता. त्यावेळी त्याला तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. पण, रुग्णालयात आणतानाच त्याचा मृत्यू झाला होता.रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याला घोषित केले. मोबाईलमध्ये कैद झालेल्या चित्रणामुळे हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

“मोहम्मद याला साप चावल्यानंतर बऱ्याच वेळाने कळवा रुग्णालयात आणले. पण रुग्णालयात आणतानाच त्याचा मृत्यू झाला,” अशी माहिती डॉ. भीमराव जाधव, अधिष्ठाता, कळवा रुग्णालय यांनी दिली आहे.

Exit mobile version