पोलिसांना शिझानच्या मोबाईलमधून २५० पानी व्हाट्स एप चॅट मिळाले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार शिझानची याआधी पण एक गर्लफ्रेंड होती अशी माहिती मिळाली आहे. शिझानने तिच्याबरोबर मोबाईलवर चॅटिंगही केले होते. पण नंतर त्याने ते डिलीट केले. शिझानने ते चॅट डिलीट का केले याचा तपास आता पोलीस घेत आहेत.
शिझानचे चॅट मिळवण्यासाठी पोलिसांनी व्हाट्स एपला पत्र लिहिले आहे. त्याचा अभ्यास आणि विश्लेषण करणे बाकी आहे. वालीव पोलिसांनी शिझानला आज न्यायालयात हजर केले. पोलिसांनी शिझानच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. शिझान चौकशीत नीट काही बोलत नसल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केला. तो एकतर गप्प राहतो किंवा वेगवेगळी विधाने करतो असे पोलीसांचं म्हणणे आहे.
शिझान खानला मृत्यूस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती पोलिसांच्या चौकशीदरम्यान शीजन वारंवार आपले म्हणणे बदलत असल्याचे म्हटल्या जात आहे. त्यामुळे पोलीस तपासात कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. चार दिवसांच्या कोठडीसाठी पोलिसांनी न्यायालयाकडून परवानगीही घेतली होती, मात्र चौकशीत काहीही समोर आले नाही.
पोलिसांनी न्यायालयाकडे कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून न्यायालयाने शिझानच्या कोठडीत ३० डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्माच्या आत्महत्येच्या एक दिवस आधी तुनिषाची आई नायगावच्या शूटिंग सेटवर गेली होती. तेथे त्याने शिझान खानला आपल्या मुलीपासून दूर राहण्यास सांगितले. आता वालिव पोलीस तुनिषा शर्माच्या आईचा जबाब पुन्हा नोंदवणार आहेत.
हे ही वाचा:
पंतप्रधानांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही
तैलचित्रातून दिसेल बाळासाहेबांचा वारसदार
खंडणी प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक
दोघांचे ब्रेकअप महिनाभरापूर्वी झाले होते, परंतु सेटवर सर्व काही सामान्य होते. टीव्ही सीरिअलच्या लडाख शूटदरम्यान दोघे प्रेमात पडले. शिझानने ब्रेकअपचे कारण वयातील फरक आणि करिअर असल्याचे सांगितले आहे. शिझान आणि तुनिशा या दोघांना वडील नव्हते. दोघांच्या कमाईने त्यांचे घर चालायचे.