गुजरातच्या वडोदरा येथे एक कबुतर पकडण्यात आले. या कबूतराच्या पायाला एक चिप लावलेली आढळली. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.
गुजरातच्या वडोदरा शहरात एक कबूतर आढळले. कबूतराच्या पायाला एक छोटे यंत्र बसविण्यात आले होते. त्यात एक चिप देखील होती. पोलिसांच्या सांगण्यानुसार ही चिप कदाचित एखाद्या संस्थेने संशोधनासाठी देखील लावलेली असू शकते. परंतु या मार्गाने काही गैर काम केले जाण्याचा धोका देखील संभवतो. त्यामुळे ती चिप काढून गांधीनगरच्या एफएसएल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आली. या कबूतराला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत.
हे ही वाचा:
रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबणार
संगमनेरमध्ये जमावाकडून पोलिसांवर हल्ला
शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर
पाकिस्तानकडून वारंवार विविध ठिकाणी शस्त्रसंधींचे उल्लंघन होताना यापूर्वी देखील आढळून आले आहे. त्याबरोबरच यापूर्वी गुजरातच्याच समुद्री हद्दीतून अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यात तटरक्षक दलाला यश आले होते, परंतु यामुळे वडोदरासारख्या संवेदनशील भागात एका पक्ष्याच्या पायातील यंत्रात चिप मिळणे हे संशयास्पद आहे. याचा वापर संशोधना व्यतिरिक्त अन्य गैरकामांसाठी देखील केला जाऊ शकतो. काही विशिष्ट तऱ्हेची माहिती देखील याद्वारे मिळवली जाऊ शकते. त्यामुळे पोलिस याचा तपास सतर्कतेने करत आहेत.