27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाधक्कादायक! बटरस्कॉच कोन आईस्क्रीममध्ये चक्क सापडले मानवी बोट!

धक्कादायक! बटरस्कॉच कोन आईस्क्रीममध्ये चक्क सापडले मानवी बोट!

डॉक्टरने दिली होती ऑर्डर

Google News Follow

Related

आईस्क्रीम हा पदार्थ आवडतो. जेवणानंतर अनेकांच्या टेबलावर आइस्क्रीम हा पदार्थ हमखास असतो,परंतु ही बातमी वाचल्यावर तुमचे आइस्क्रीमवरचे प्रेम काहीसे कमी होऊ शकते.

मुंबईतील मालाड मध्ये राहणाऱ्या एका डॉक्टरने ऑनलाईन मागवलेल्या ‘बटरस्कॉच कोन’मध्ये चक्क मानवी बोट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांनी हे बोट ताब्यात घेऊन फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवले असून या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईतील पश्चिम उपनगरातील मालाड परिसरात राहणारे २७ वर्षीय डॉक्टर ऑर्लेम ब्रेंडन सेराओ यांनी बुधवारी झेप्टो या डिलिव्हरी ॲप वरून आइस्क्रीम कोनची ऑर्डर केली होती. यम्मो कंपनीचे बटरस्कॉच कोन हे आइस्क्रीम डिलिव्हरी बॉयने ऑर्डर दिल्यानंतर डॉक्टर सेराओ यांनी ते खाण्यासाठी उघडले. त्याचा एक बाईट घेताच त्यांना तोंडात टणक पदार्थ लागले, चॉकलेट किंवा बदाम काजू असेल असे त्यांना वाटले,त्यांनी तो तुकडा तोंडातून बाहेर काढताच त्यांना धक्का बसला.

हे ही वाचा:

अल्लाह तआला देख लेगा… ‘न्यूज डंका’च्या बातमीसह ‘हा’ मेसेज व्हायरल

परममित्र प्रकाशनाचे माधव जोशी यांचे निधन

भूस्खलनग्रस्त पापुआ न्यू गिनीला भारताची मदत!

पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत २० लाखांची फसवणूक!

आइस्क्रीममध्ये चक्क मानवी हाताचा अंगठाचा तुकडा होता, त्याने प्रथम आपली बोटे तपासली,आपली बोटे शाबूत आहे, हे कळल्यावर त्याने आइस्क्रीम बाजूला ठेवून गुळण्या करून तोंड धुतले, त्यानंतर त्याने झेप्टो अँपवर तक्रार दाखल केली, आणि मालाड पोलीसांना कळवले.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, २ से.मी चा बोटाचा तुकडा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवला जाईल. ज्या ठिकाणी आइस्क्रीम बनवले जाते आणि पॅक केले जाते त्या ठिकाणाचाही शोध घेतला जाईल. हे प्रकरण ”आम्ही गांभीर्याने घेतले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा