31 C
Mumbai
Thursday, November 28, 2024
घरक्राईमनामासंभलमधील दंगलखोरांचे फोटो प्रसिद्ध; अल्पवयीन मुलासांह महिलांचाही समावेश

संभलमधील दंगलखोरांचे फोटो प्रसिद्ध; अल्पवयीन मुलासांह महिलांचाही समावेश

दंगलखोरांच्या पोस्टरमध्ये २० ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांचे फोटो

Google News Follow

Related

संभल हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यात आली असून हिंसाचारात सहभागी असलेल्या सर्व दंगलखोरांचे फोटो पोस्टरद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. पोलिसांनी जारी केलेल्या पोस्टरमध्ये दंगलखोरांमध्ये २० ते ३० वर्षे वयोगटातील तरुण तसेच अल्पवयीन मुलांनी हिंसा भडकावण्यात मोठी भूमिका बजावली आहे, असे दिसून आले आहे.

याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सापडलेल्या व्हिडिओ आणि फुटेजमध्ये अल्पवयीन तरुण आणि महिलांचा समावेश आहे. मात्र, पोलिसांनी महिला आणि अल्पवयीन मुलांचे पोस्टर जारी केलेले नाहीत. संभलचे एसपी कृष्ण कुमार विश्नोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त जमावाला कोणीही रोखण्याचा प्रयत्न करत नसल्याचे स्पष्ट आहे. एवढेच नाही तर जो कोणी आला तो गर्दीचा भाग बनून दंगलीत सामील झाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

पोलीस प्रशासनाच्या हाती लागलेला व्हिडिओ संभळ हिंसाचारावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. जमाव जामा मशिदीच्या मागूनच का पोहोचला? हल्लेखोरांकडे पिस्तूल कुठून आली? पोलीसही या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. एका व्हिडिओमध्ये एक तरुण तोंडाला कापड बांधून पिस्तुलाने गोळीबार करताना दिसत आहे. दंगलीत जामा मशिदीजवळील तारा जळाल्याने वीज विभागाचेही नुकसान झाले. वीज विभागाने नुकसानीचे मूल्यांकन करून अहवाल तयार केला आहे. यात दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दंगलखोरांविरुद्ध कोतवालीत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

जामा मशीद विरुद्ध हरिहर मंदिर प्रकरणावर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाचे आयुक्त रमेश सिंह राघव न्यायालयात अहवाल सादर करू शकतात. या सर्वेक्षणाचा आढावा घेत असल्याचे न्यायालय आयुक्तांनी सांगितले. हा अहवाल २९ नोव्हेंबर रोजी न्यायालयात सादर केला जाणार आहे. अहवालाचा आढावा पूर्ण न झाल्यास न्यायालयाला मुदत वाढवून देण्याची विनंती करू.

हे ही वाचा..

एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे देश सोडून जातील

संभलमध्ये हिंसाचारादरम्यान अचानक मोठ्या संख्येने लोक शस्त्रे घेऊन कसे पोहचले?

घाटकोपरमध्ये लव्ह जिहाद प्रकरण, आरोपी नौशादवर गुन्हा दाखल!

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी!

या आदेशानंतर कोर्ट कमिशनरने १९ आणि २४ नोव्हेंबर रोजी मशिदीत पोहोचून पाहणी केली. या खटल्यातील फिर्यादींमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे वकील हरिशंकर जैन, पार्थ यादव, महंत ऋषिराज गिरी, राकेश कुमार, जीत पाल सिंह यादव, मदनपाल, वेदपाल आणि दीनानाथ यांचा समावेश आहे. हरिशंकर जैन यांचा मुलगा विष्णू शंकर जैन हे या प्रकरणात वकील म्हणून सहभागी आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
201,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा