बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या मुंबईतील राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सैफ अली खान याच्या घरात शिरलेल्या चोराकडून त्याच्यावर चाकू हल्ला झाल्याची माहिती आहे. सध्या सैफ याच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून एकूण १५ पथके आरोपीचा शोध घेत आहेत. अशातच पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेजमधील फोटो हाती लागला आहे.
सैफ अली खान याच्यावर बुधवारी मध्यरात्री हल्ला झाला. आरोपीने त्याच्यावर सहा वार केले त्यातील दोन वार हे अत्यंत खोलवर होते. यानंतर तातडीने सैफ याला रुग्णालयात दाखल करण्यात आले तर पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, पोलिसांच्या हाती आता थेट सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीचा फोटो लागला आहे. त्यामुळे तपासाला वेग येणार आहे.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. या आरोपीने सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्यानंतर बाहेर पडण्यासाठी पायऱ्यांचा वापर केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपास केला असता त्यात आरोपी पायऱ्यावरून उतरताना सहाव्या मजल्यावर दिसला. या फोटोवर २ वाजून ३३ मिनिटांची वेळ दिसत आहे.
हे ही वाचा..
‘स्टार्टअप्स’साठीचे नवीन धोरण देशातील सर्वाधिक आधुनिक ठरेल
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आठव्या वेतन आयोगाला मंजुरी!
भाजपाने दिल्लीत ७० पैकी ६८ जागी दिले उमेदवार
इंदिरा गांधी महान नेत्या, पण आमच्यासाठी त्याकाळी खलनायक!
सैफ अली खानवर मध्यरात्री घरात हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. इमारतीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्हे उपस्थित केली जात आहेत. दरम्यान ही घटना समोर तपास करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या आठ टीम बनवण्यात आल्या आहेत. तर मुंबई पोलिसांच्या सात टीम तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा वेगाने तपास करण्यासाठी एकूण १५ पथकं बनवण्यात आली आहेत.