पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती

अँटी टेररिस्ट स्क्वाड म्हणजेच एटीएसच्या तपासातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संबंधित धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे.

पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती

एटीएस तपासातून धक्कदायक माहिती समोर

अँटी टेररिस्ट स्क्वाड म्हणजेच एटीएसच्या तपासातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संबंधित धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. या संबंधी सरकारी पक्षाने नाशिक जिल्हा न्यायालयात दावा केला आहे. पीएफआयला राम मंदिर पाडून त्याजागी पुन्हा बाबरी मस्जिद बांधायची होती, असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

पीएफआयला राम मंदिर पाडून त्याजागी बाबरी मस्जिद बांधायची होती. त्यासाठी प्लानिंग सुरू असल्याची माहिती एटीएस तपासातून समोर आली आहे. यासंबंधीचा दावा सरकारी पक्षाने नाशिक जिल्हा न्यायालयात केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पीएफाय संबंधीच्या जागा आणि व्यक्ती राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर होत्या. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये एनआयएकडून कारवाई सुरू आहे. या दरम्यान अनेक पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक देखील करण्यात आली होती. दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका पीएफआयवर ठेवण्यात आला आहे.

हे ही वाचा

पाऊस पुण्यात पुणे पाण्यात

आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका

नायजेरियात महापुराची तयारीच नसल्याने गमावले शेकडो जीव

सुशांतसिंग राजपूतच्या मैत्रिणीच्या आत्महत्येचे कारण आले समोर

दरम्यान, केंद्र सरकारने मोठा महत्त्वाचा निर्णय घेत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. तपास यंत्रणांच्या शिफारशीनंतर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला असून केंद्र सरकारकडून यासंबंधीचा अध्यादेश जारी करण्यात आला.

Exit mobile version