ऑगस्ट २०२० बंगळुरूमध्ये झालेल्या दंगलींच्या प्रकरणात एनआयएने चार्जशीट दाखल केली आहे. त्यात असे म्हटले आहे की, सीएए आणि एनआरसी विरोधात नाराज होऊन दंगलखोरांनी हिंसाचार केला. एनआयएने ७ हजार पानांची चार्जशीट दाखल केली आहे, ज्यामध्ये २४७ लोकांवर युएपीए आणि आयपीसी कलाम १२०बी च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये मुहम्मदावर फेसबुकवर ‘आक्षेपार्ह’ पोस्ट केल्याबद्दल बंगळुरूमध्ये हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात तीस ते चाळीस पोलीस कर्मचारी आणि काही पत्रकार जखमी झाले होते तर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले होते. त्यावेळी अनेक माध्यमांमधून मुसलमानच हिंदू मंदिरांचे रक्षण करत असल्याचा खोटा दावा केला जात होता.
हे ही वाचा:
चार्जशीटमध्ये दाखल केलेल्या २४७ नावांपैकी ४७ नावे ही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या मुस्लिम संघटनांमधील लोकांची आहेत. चार्जशीटमध्ये असे नोंदवले आहे की, बंगळुरूमध्ये झालेल्या दंगली या उत्स्फूर्त नसून त्यामागे मोठे षडयंत्र आहे. या दंगलींमध्ये हिंसाचार करण्यासाठी समाज माध्यमांमध्ये अनेक ग्रुप तयार करण्यात आल्याची माहितीही एनआयएच्या चार्जशीटमधून मिळत आहे.