सेप्टिक टॅंकमधील मृतदेहाचे गूढ उकलले; एकाला अटक

जोगेश्वरीतील घटना

सेप्टिक टॅंकमधील मृतदेहाचे गूढ उकलले; एकाला अटक

जोगेश्वरी पश्चिम येथील एका बांधकाम साईटवरील सेप्टिक टॅंकमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकळण्यास पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून सहकाऱ्याने हत्या करून मृतदेह सेप्टिक टॅंक मध्ये टाकल्याचे उघडकीस आले आहे. ओशिवरा पोलिसांनी सहकाऱ्याला अटक केली आहे.

 

३ ऑगस्ट रोजी ओशिवरा पोलिसांना जोगेश्वरी पश्चिम एस.व्ही.रोड येथील एका बांधकाम साईटवर असलेल्या सेप्टिक टॅंकमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अज्ञात व्यक्ती विरुद्ध हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

हे ही वाचा:

टेस्लाला प्राप्त होणार भारतीय ‘वैभव’

बलुचिस्तानमध्ये सुरुंगस्फोट; युनियन कौन्सिलच्या अध्यक्षासह सात जणांचा मृत्यू

सरकार जिंकले; दिल्ली सेवा विधेयक १३१ वि. १०२ मतांनी संमत

पुण्यातल्या दहशतवाद्यांच्या कारमध्ये सापडली होती जिवंत काडतुसं

 

पोलिसांनी मुंबई, ठाणे आणि परिसरातील पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या हरवलेल्या व्यक्तीची माहिती मागवून मृतदेहाची ओळख पटविण्यात येत होती. दरम्यान, अंधेरी पोलीस ठाण्यात दोन मित्र २७ जुलै रोजी हरवल्याची नोंद तपास पथकाला मिळून आली. पोलिसांनी हरवलेल्या दोघांचे छायाचित्रे आणि माहिती घेऊन दोघांचा शोध सुरू केला असता २ ऑगस्ट रोजी दोघांपैकी एक मित्र केरा चरका राय हा बांधकाम साईटवर परत आल्याची माहिती ओशिवरा पोलीस पथकाला मिळाली.

 

पोलिसांनी केरा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चरका पुजहर असे पोलिसांना मिळून आलेल्या मृत व्यक्तीचे नाव असून केरा आणि चरका या दोघांमध्ये गावी जाण्यावरून वाद झाला. या वादातून केरा याने चरका याला बांबूने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर केरा याने जवळच असलेल्या सेफ्टी टॅंक मध्ये त्याचा मृतदेह टाकून तेथून पळ काढला होता, अशी माहिती तपासात समोर आली. ओशिवरा पोलिसा कडून केरा याला हत्येच्या गुन्हयात अटक करण्यात आली.

Exit mobile version