इंडोनेशियातील आठवड्याभराच्या सुट्टीवरून परतणाऱ्या पुण्यातील एका ५१ वर्षीय व्यक्तीला रविवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याच्या पासपोर्टमधील पाने फाडल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
सहार पोलिसांच्या तपासात असे आढळून आले की, त्याने गेल्या वर्षी बँकॉकच्या चार ट्रिप केल्या होत्या, ही गोष्ट त्याच्या कुटूंबियांना माहिती नव्हती आणि कळू ही द्यायची नव्हती. यासाठी त्याने पासपोर्ट मधील बँकॉकचा ठप्पा असलेली पाने फाडली होती.
जाणूनबुजून पासपोर्ट खराब करणे हा पासपोर्ट कायदा, १९६७ अंतर्गत गुन्हा आहे. व्हीके भालेराव नावाच्या या व्यक्तीवर बीएनएस कलम ३१८ (४) (एखाद्या व्यक्तीला फसवणे, किंवा फसवणूक करून किंवा अप्रामाणिकपणे एखाद्या व्यक्तीला मालमत्ता देण्यासाठी प्रवृत्त करणे) अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भालेरावच्या पासपोर्टमधून पाने गहाळ असल्याचे आढळल्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी दरम्यान त्याला ताब्यात घेतले.
हे ही वाचा:
“तो पुन्हा येतोय… वेगाचा कहर घेऊन!”
एनएसएस शिबिरात हिंदू विद्यार्थ्यांना नमाज पढण्याची केली गेली सक्ती!
‘वक्फ सुधारणा विधेयक’: सर्वोच्च न्यायालयाकडून कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती नाही!
नॅशनल हेराल्ड प्रकरणात गांधी कुटुंबाला कायद्याचा सामना करावा लागेल
अधिकाऱ्यांना आढळले की पाने १७/१८ आणि २१-२६ गहाळ आहेत,” असे सहार पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्या पानांवर थायलंडच्या सहलींसाठी इमिग्रेशन स्टॅम्प होते, असे सहाय्यक इमिग्रेशन अधिकारी राजीव कुमार यांनी त्यांच्या पोलिस तक्रारीत म्हटले आहे.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, भालेरावने सुरुवातीला पासपोर्टमध्ये छेडछाड करण्याचे कारण सांगण्यास नकार दिला. यामुळे कुमारने त्याला विंग इन्चार्ज विलास वडनेरे आणि ड्युटी ऑफिसर विजय कुमार यादव यांच्यासमोर हजर केले. “सतत चौकशी केल्यामुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांना हे सत्य कळले की त्याने त्याच्या बँकॉक ट्रिप त्याच्या कुटुंबापासून लपवण्यासाठी पाने फाडली होती,” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.