शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने माथाडी कामगाराने स्वतःवर गोळी झाडली

रुग्णालयात दाखल,

शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने माथाडी कामगाराने स्वतःवर गोळी झाडली

शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यामुळे ३८ वर्षीय माथाडी कामगाराने देशी पिस्तुल मधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला.गुरुवारी पहाटे भांडुप येथे घडलेल्या या घटनेत माथाडी कामगार असलेला इसम गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शेअर्स मार्केट दलालाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मनोज चंद्रकांत भोसले (३८) असे गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या माथाडी कामगाराचे नाव आहे. भांडुप पश्चिम सुभाष नगर येथील म्हाडा कॉलनी येथे पत्नी आणि मुलांसोबत राहण्यास आहे. मनोज भोसले यांनी शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी एका शेअर्स दलालाकडे २३ लाख रुपये दिले होते. काही महिने भोसले यांना काही रिटर्न मिळाले होते, परंतु शेअर मार्केट कोसळल्यामुळे गुंतवणूक केलेली रक्कम बुडल्याचे दलालाने भोसले यांना सांगितले.

हे ही वाचा:

दाऊदी बोहरा समाज वक्फ विधेयकाबाबत मोदींना म्हणाला, धन्यवाद!!

‘न्यायालय सुपर संसद झाली आहे का?’

गोधडी हीच सोय, तीच समस्या…

नॅशनल हेराल्ड प्रकरण म्हणजे दरोडा, सोनिया गांधी, राहुल गांधी आधुनिक दरोडेखोर”

भोसले यांना धक्का सहन न झाल्यामुळे काही दिवसापासून ते तणावात होते. गुरुवारी पहाटे भोसले हे पत्नी मुलांसह घरी परतले असता इमारतीच्या जिन्यातच त्याने देशी पिस्तुल मधून स्वतःच्या गळ्यावर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला.
या गोळीबारात जखमी झालेल्या भोसले यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी शेअर्स दलालावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसले याने देशी पिस्तुल कुठून मिळवले याचा तपास सुरू आहे.

Exit mobile version