महिला भिकारणीला फेकले स्कायवॉकवरून 

महिला भिकारणीला फेकले स्कायवॉकवरून 

छिल्लरच्या मते कोविड-१९ काळात महिलांवरील अत्याचारात वाढ.

भीक मागायची असेल तर दररोज २०० रुपये द्यावे लागतील, अन्यथा या जागेवर बसायचे नाही, मात्र ही माझी जागा आहे मी पैसे देणार नाही, असे उत्तर देताच संतापलेल्या भिकाऱ्याने महिला भिकारणीला मारहाण करून स्कायवॉकवरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेला घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी भिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

रिना शेख असे (३०) असे या जखमी भिकारी महिलेचे नाव आहे. डोंबिवलीच्या पिसवली येथे राहणाऱ्या रिना शेखला दोन लहान मुले असून वर्षभरापूर्वी पती सोडून गेल्यानंतर मुलांची जबाबदारी रिनावर आली होती. कामधंदा मिळत नसल्यामुळे आणि मुलांची उपासमार सुरू असल्यामुळे अखेर रिनाने भीक मागण्याचा मार्ग पत्करला. ती कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉक जवळ भीक मागू लागली. रेल्वे स्थानक जवळ असल्यामुळे तसेच जवळच बाजारपेठ असल्यामुळे रिनाला चांगली भीक मिळू लागली होती.

हे ही वाचा:

२६ जुलैनंतर १६ वर्षे तीच स्थिती

मरीन ड्राईव्हमध्ये ८ वकिलांविरुद्ध लैगिंग अत्याचार, खंडणीचा गुन्हा

महाराष्ट्रात आत्तापर्यंत पुरामुळे १३८ जणांनी गमावले प्राण

तौक्तेच्या बार्जचा पालघरमधल्या स्थानिक मच्छिमारांना फटका

हा प्रकार दुसरा भिकारी रामू बांदलकर याला खटकू लागली. त्याने रिनाला या जागेवरून उठून दुसरीकडे भीक माग म्हणून सांगितले. इथे बसायचे असल्यास मला दररोज २०० रुपये द्यावे लागतील, असा दमही त्याने रिनाला दिला. मात्र मी जाग सोडणार नाही आणि पैसे देखील देणार नाही, असे रामू याला सांगितले. यामुळे संतापलेल्या रामू या भिकाऱ्याने रिनाला स्कायवॉकवर मारहाण करून तिला स्कायवॉक वरून खाली लोटून दिले. यात रिना गंभीर जखमी झाली. घटनस्थळी दाखल झालेल्या महात्मा फुले चौक पोलिसांनी तिला रुख्मिणीबाई रुग्णालयात दाखल करून रामू याला अटक करून  त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version