31 C
Mumbai
Sunday, December 15, 2024
घरक्राईमनामाविनयभंग करून पैसे हिसकावून नेणाऱ्याला चोराला २४ तासांतच अटक

विनयभंग करून पैसे हिसकावून नेणाऱ्याला चोराला २४ तासांतच अटक

Google News Follow

Related

अंधेरी येथे एका एटीएम सेंटरमध्ये पैसे काढणाऱ्या महिलेचा विनयभंग करून तिच्याकडून पैसे हिसकावून पळालेल्या चोराला पोलिसांनी २४ तासांतच जेरबंद केले आहे.

सदर महिला आगरकर चौक, अंधेरी रेल्वे स्थानक, अंधेरी पूर्व मुंबई येथील बॅक ऑफ बडोदामधील एटीएममधून पैसे काढत असतांना तेथे असलेल्या अनोळखी इसमाने फिर्यादी हे पैसे काढत असतांना त्यांचे पाठीवर चुंबन घेऊन विनयभंग केला व त्यांच्या हातातील एटीएममधून काढलेले पैसे जबरीने चोरी करून पळून गेला. म्हणून फिर्यादी  सदर घटनेबाबत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्या असता त्यांचा सविस्तर जबाब नोंद करून अंधेरी पेालीस ठाणे गुरक्र 25/2022 कलम 354, 354 ड, 392 भा.द. वि.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास व.पो.नि. संताजी घोरपडे, तसेच पोनि. शिवाजी पावडे (गुन्हे ) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक दिगंबर पगार, पो.ह. राजेंद्र पेडणेकर, पो. ना. हेमंत सुर्यवंषी, पो.शि. प्रविण जाधव, पो.शि. अविनाश कापसे, पो.शि. सागर सोनजे, पो.शि. विजयानंद लोंढे, पो.शि. विजय मोरे, पो.शि. विशाल पिसाळ यांनी घटनास्थळावरील CCTV Footage तपासून तसेच नमुद बॅंकेच्या एटीएमचे CCTV Footage प्राप्त करण्यात आले.

त्यानुसार सदर ठिकाणी संषयित इसम हा दिसून आला. त्यानंतर त्याला CCTV Footage व्दारे फॉलो केले असता तो अंधेरी रेल्वे स्थानकावर जावून तेथून त्याने हार्बर लाईच्या प्लॅटफॉर्म नं. 01 वरून गोरेगांवच्या दिशेने जाणारी लोकल ट्रेन पकडली. त्यानुसार पुन्हा प्रत्येक स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता तो राममंदिर स्थानकावर उतरतांना दिसला. त्यानंतर तो बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये बसला. बोरिवलीला उतरून परत तो विरार लोकल गाडीने नालासोपारा येथे उतरतांना दिसला. त्यादरम्यान बॅक ऑफ बडोदा या बॅंकेत संपर्क साधून घटना घडलेल्या वेळेच्या अगोदर ५ मिनिटाचे व नंतर ५ मिनिटांचे झालेेल्या व्यवहारासंदर्भात पत्रव्यवहार करून त्यामध्ये एटीएम कार्डची माहिती प्राप्त केली असता त्यामध्ये एकूण १२वेळा व्यवहार झाल्याची माहिती मिळाली.

त्याअन्वये सर्व कार्ड धारकांची नमूद बॅकांमध्ये जावून वैयक्तिक माहिती घेतली असता एका कार्डधारकाची माहिती व माहितीमध्ये मिळालेला पत्ता व संशयित आरोपी नालासोपारा लोकल स्थानकावर उतरला. तेथील ठिकाणाच्या पत्त्यामध्ये साम्य आढळून आल्याने त्यानुसार नमुद संशयित इसमाचा सदर ठिकाणी शोध घेतला असता आरोपीचे घर आढळले. त्यानुसार त्याचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून तो बॅंकेतील प्राप्त झालेल्या मोबाईल क्रमांकासारखाच आढळून आला. त्याअन्वये तात्काळ पो. शि. पिसाळ यांच्याशी संपर्क साधून नमुद संशयित आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे CDR/SDR/LOCATION प्राप्त करून त्यास एमआयडीसी अंधेरी पूर्व मुंबई परिसरातून ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यास आणले असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने तसेच त्याचा नमुद गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास नमूद गुन्हयात अटक करण्यात आली.

हे ही वाचा:

पणजीतून शिवसेनेने उमेदवार दिला पण उत्पल पर्रीकर लढत असतील तर…

अमोल कोल्हेंबाबत शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात मतभेद

वडिलांच्या संपत्तीवर कोणाचा अधिकार जास्त? सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात नंबर वन  

 

सदर तपासात मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-१०, मुंबई डॉ. महेश्वर रेड्डी, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, अंधेरी विभाग, मुंबई श्री. दिनेष गांवकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंधेरी पोलीस ठाणे संताजी घेारपडे, शिवाजी पावडे पोनि (गुन्हे) यांनी मार्गदर्शन केले.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अविनाश अशोक कासार (२९ वर्ष) राहणार साईं मंदिर चाळ, लक्ष्मी नगर नालासोपारा, ईस्ट ठाणे पश्चिम पालघर.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा