इमारतीमध्ये प्रवेश नाकारल्याच्या रागातून एका माथेफिरू तरुणाने केलेल्या मारहाणीमध्ये ६० वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन भांडुप पोलिसांनी आरोपी विशाल गावडे याला बेड्या ठोकल्या आहेत.
भांडुप पश्चिमेकडील टेंभीपाडा परिसरात कुटुंबासोबत राहात असलेले शिवाजी बारवे हे भांडुप रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या ड्रीम्स सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. नेहमीप्रमाणे २७ ऑगस्टच्या रात्री ते ड्युटीवर हजर झाले. रात्री साडे नऊच्या सुमारास यातील आरोपी विशाल गावडे याने इमारतीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. बारवे यांनी त्याला अडवून नाव विचारत कोणाकडे जायाचे आहे अशी विचारणा केली.
गावडे याला त्याचा राग आला. त्याने बारवे यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने बारवे यांचे डोके येथील कठड्यावर आपटले. तसेच, त्यांना जमिनीवर आपटले. हल्ल्यात बारवे हे गंभीर जखमी झाले. अन्य सहकारी सुरक्षा रक्षकांनी बारवे यांची गावडेच्या तावडीतून सुटका करत मुलगा निलेश (२७) याला कळवले.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालच्या शिकारीकडून मुंबईत तिघांची हत्या ?
प्रीती पालने पदक जिंकून रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन भाजपात सामील !
नेमबाज अवनी लेखराला पॅरालिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा सुवर्ण!
निलेशने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी अवस्थेतील वडिलांना तातडीने उपचारांसाठी ड्रीम्स हॉस्पीटल दाखल केले. त्यानंतर, त्याने वडिलांना पुढील उपचारांसाठी केईएम रुग्णालयात नेले. येथे उपचारांदरम्यान डॉक्टरांनी बारवे यांना मृत घोषित केले. घटनेची नोंद करुन तपास करत असलेल्या भांडुप पोलिसांनी निलेश यांची फिर्याद नोंदवून घेत आरोपी विशाल गावडे विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
…………………..