गांजा तस्करी करणारा आरोपी चार महिन्यांनंतर अखेर अटकेत

गांजा तस्करी करणारा आरोपी चार महिन्यांनंतर अखेर अटकेत

चार महिन्यांच्या प्रदीर्घ पाठलागानंतर अखेरीस शहरातील अंमली पदार्थ विरोधी सेलने १ हजार ८०० किलो गांजा तस्करीप्रकरणी आरोपी असलेल्या संदीप सातपुते या आरोपीस अटक केली. ठाण्यातील लुईसवाडी भागामध्ये हा राहणारा असून, तो नेपाळमध्ये पळून गेला होता. अखेर घरी परतल्यानंतर त्याला पकडण्यात आले.

संदीपकडून साडेतीन कोटी रुपयांचा जप्त केलेला गांजा सुरत येथे तस्करी करायचा होता. परंतु गुजरात पोलिसांनी त्याला अटक केली असल्याने यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्याला पकडून मुंबईला आणण्यात आले. आकाश यादव (वय ३५) आणि त्याचा साथीदार दिनेशकुमार सरोज उर्फ सोनू (वय ४०) या दोघांकडून फेब्रुवारी महिन्यात १ हजार ८०० किलोंचा गांजा जप्त केला होता.

हे ही वाचा:

बंगलोसेनेतील अजून एका नेत्याचा अनधिकृत बंगला?

पोलिसांच्या वाट्यालाही ठाकरे सरकारकडून उपेक्षा!

पुण्यात घरांच्या तोडकामावरून सुप्रिया सुळे-अजित पवार आमनेसामने

ट्विटरच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याचाच राजीनामा

आरोपींनी ओदिशाहून अमली पदार्थांची शहरात शहरात तस्करी केली होती. परंतु कथित मुख्य खरेदीदार व पुरवठा करणारे सातपुते शहर सोडून पळून गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी दरमहा पाच टन गांजा तस्करी राज्यात करतो, त्यापैकी सुमारे साडेतीन टन एकट्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये या गांजाचे वाटप होते.

यादव आणि सोनू दोघांवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुजरातमध्ये यादव विरोधात तीन फौजदारी खटले आहेत. ठाण्यातून पळून गेल्यानंतर सातपुते मध्यप्रदेशातील इंदूर आणि त्यानंतर नेपाळमध्ये उतरण्यापूर्वी गोरखपूरला गेले.

डीसीपी दत्ता नलावडे आणि वरिष्ठ निरीक्षक लता सुतार यांच्या नेतृत्वाखालील पथक सातपुते यांच्यावर लक्ष ठेवत होते. यादव याला २५ हजार तर, सोनूला दरमहा ३५ हजार रुपये देण्याचे आश्वासन सातपुते याने दिले होते. ८ हजार रुपयांमध्ये विकत आणलेला हा गांजा महाराष्ट्रात तब्बल १८ ते २० हजारांच्या भावाने विकला गेला होता.

Exit mobile version