सीएसएमटी येथे बेस्ट बसच्या चाकाखाली चिरडून ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीला दुचाकीने धडक दिली होती. त्यामुळे तो खाली कोसळून बसच्या मागच्या चाकाखाली आल्याची माहिती उघड झाली आहे.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून त्यांना धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी बेस्ट बस चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
सीएसएमटी परिसरातील भाटीया जंक्शन येथे बुधवारी साडे चारच्या सुमारास हा अपघात घडला. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत व्यक्तीने पांढरे शर्ट व लुंगी नेसली होती. तो भाटीया जंक्शन येथून जात असताना त्याला दुचाकीने धडक दिली. त्यामुळे त्या व्यक्तीचा तोल गेला व तो खाली कोसळला.
यावेळी तो बेस्ट बसच्या मागच्या चाकाखाली आल्यामुळे त्याचे डोके चिरडले गेले व त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्ती अंदाजे ६० वर्ष वयोगटातील असल्याचा संशय आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करत असून त्याद्वारे दुचाकीस्वाराचा शोध सुरू आहे.
हे ही वाचा:
कपूर कुटुंबीय पंतप्रधानांच्या भेटीला!
जोडे पूजण्यासाठी, जोडेपुशे म्हटले; जोड्यांनी मार खाल्ला…
दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना लाडकी बहिण योजनेतून वगळा!
कुर्ला बेस्ट ई-बस अपघातप्रकरण; मृत फातिमा यांच्या अंगावरील दागिने चोरले? ?
मृतदेह सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आला असून त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र सापडले नाही. त्यामुळे त्याची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
बेस्ट बस चालक ज्ञानदेव जगदाळे यांची पोलिसांनी चौकशी केली असून मृत व्यक्ती मागच्या चाकाखाली आल्याचे त्याने सांगितले. आहे. त्यांची बस अणुशक्ती नगर येथून कुलाबा येथे जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. त्यावेळी जागीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.