दुसऱ्या व्यक्तीच्या नावे याचिका करणारा भामटा अटकेत

दुसऱ्या व्यक्तीच्या नावे याचिका करणारा भामटा अटकेत

तोतया याचिकाकर्त्याला आणि वकिलाला खंडपीठाचा दणका

न्यायालयामध्ये अनेकदा अशीही प्रकरणे येतात, ज्यामुळे आपल्या पायाखालची जमिन सरकते. असेच एक प्रकरण नुकतेच घडलेले आहे. जमिनीविषयीचा एक मुद्दा उघडकीस आला आहे. एका महिलेला अंधारात ठेवून जमिनीविषयीच्या प्रकरणात तिला गोवण्यात आलेले आहे. यासंदर्भातील याचिका दाखल करणारे संदीप धारणे तसेच नोटरी करणारे वकील एस. एम. नक्वी यांना आता न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा बडगा दाखवण्यात आलेला आहे. तसेच आता त्यांना कारणे दाखवा नोटीस उच्च न्यायालयाने बजावली आहे.

न्या शाहरुख काथावाला आणि न्या मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने या दोघांकडून आता २१ तारखेपर्यंत उत्तर मागितले आहे. त्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. धनलक्ष्मी चंद्रकांत देवरुखकर यांचे खरे नाव समिना अरिफ खान असे आहे. यांच्या नावे अड्व्होकेट रोहन बर्गे यांच्यामार्फेत गतवर्षी रिट दाखल करण्यात आली. परंतु समिना यांनी मात्र अशी कोणतीही रिट दाखल केली नव्हती. याचा खुलासा त्यांनी प्रशांत पांडे यांच्यातर्फे केला. तसेच दाखल करण्यात आलेल्या रिटमध्ये समिना यांची सही सुद्धा नसल्याचे त्यांनी खुलाशाच्या माध्यमातून म्हटले आहे. म्हणूनच खंडपीठाने बर्गे यांच्याकडे यासंदर्भात उत्तर मागितली. त्यावेळी महसूल विभागाशी निगडित प्रकरणाचा उल्लेख केला. उत्तरादाखल बर्गे यांनी संदीप धारणे यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले. तसेच महसूल विभागाशी सुनावणींसाठी मला कुलमुखत्यारपत्र देण्यात आले होते. तसेच यावेळी याचिका करत असताना समिना या स्वतः रुग्णालयात दाखल होत्या. त्यानंतरच मी याचिकेवर सही केली असे धारणे यांनी प्रतिज्ञापत्रात दिले.

त्यानंतर धारणे यांच्याकडे खंडपीठाने मूळ कुलमुखत्यारपत्राची प्रत मागितली. परंतु त्यांना ती प्रत देता आली नाही. तसेच याची नक्कल प्रतही देण्यात धारणे अयशस्वी ठरले. या एकूणच प्रकारावर समिना यांनी प्रकाशझोत टाकत म्हटले, की मी रुग्णालयात दखाल नव्हते. तसेच अशी याचिका करणार याबद्दल धरणे यांनी त्यांना काहीही कळवले नव्हते. त्यानंतर खंडपीठाने हे ऐकून घेतल्यानंतर, धरणे यांच्या याचिकेवर नोटरी करणारे वकिल एस. एम. नक्वी यांना बोलावले.

 

हे ही वाचा:

दिलासादायक! गेल्या २४ तासांत मुंबईत एकही कोविड मृत्यूची नोंद नाही

माजी गृहमंत्री अनिल देशमुख : ‘बेपत्ता होणे’ शोभते का ?

पंचाने केली नवाब मलिक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

केरळमध्ये पावसाचे तांडव! भुस्खलनामुळे जीवित हानी

 

याचिकेवरील सत्यापनाच्या जागेवर असलेली समिना यांची सही तुमच्यासमोर केली आहे का असा प्रस्न खंडपीठाने विचारला. याबाबत त्यांनी होकार दिला. परंतु नक्वी खोटे बोलत असल्याचे खंडपीठाच्या लक्षात आले. खंडपीठाने कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतर नक्वी यांनी खरे ते सर्व कबूल केले. ते म्हणाले, ती सही धारणे यांनीच केली होती. खंडपीठाने घडलेल्या या प्रकारावर न्यायालयाचा अनादर करण्यासह अव्यावसायिक वर्तणुक केली असे निरीक्षणांती म्हटले. आणि धारणे यांनी न्यायालयाचा अनादर करण्यात हस्तक्षेप केला याबद्दलही नोटीस काढली.

Exit mobile version