लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या ५७ दुग्ध व्यवसायिकाने कर्जदाराच्या जाचाला कंटाळून ट्रेनखाली स्वतःला झोकावून आत्महत्या केल्याची घटना गुरु तेग बहादूर (GTB) नगर स्थानक जवळ घडली.वडाळा रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी कर्जदारा विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
शाहू माने असे या व्यवसायिकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी वडाळा रेल्वे पोलिसांना गुरु तेग बहादूर (GTB) नगर स्थानक जवळ एक व्यक्ती जखमी अवस्थेत मिळून आला होता, पोलिसांनी त्याला तात्काळ सायन रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
हे ही वाचा:
मुंबईतून ६ घुसखोर बांगलादेशीना अटक, निवडणुकीत झाले मतदान!
आईला धडक देणाऱ्या कार चालकाची मुलांनी केली हत्या
भारताने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना परत पाठवावे!
अल्लू अर्जुनच्या घरावरील हल्ल्यातील आरोपींना जामीन, रेवंत रेड्डींशी संबंध!
पोलिसांना मृतदेहाजवळ मिळून आलेल्या सुसाईड नोट वरून मृतदेहाची ओळख पटली. शाहू माने असे त्याचे नाव असून सायन कोळीवाडा येथे राहणारा आहे, सुसाईड नोटमध्ये त्याने म्हटले आहे की, त्याचे कर्जदार त्याच्याकडून कर्ज घेतलेल्या पैशासाठी त्याचा छळ करत आहेत.
शाहू यांनी त्कोविड-19 लॉकडाऊनपूर्वी व्यवसायासाठी पैसे घेतले होते, त्या पैशातून त्याने दुग्ध व्यवसाय सुरू केला, परंतु लॉकडाऊन मुळे व्यवसाय बुडाला आणि तो कर्जबाजारी झाला होता. त्यानंतर त्याच्याकडे कामधंदा नव्हता, त्यामुळे तो कर्जाची परत फेड करू शकला नाही, कर्जदारांनी त्याच्यामागे तगादा लावला होता,त्यामुळे त्याला कठोर पाऊल उचलावे लागले.