‘मन की बात’ कार्यक्रमाचे पुस्तक छापण्यावरून लुबाडले

कांदिवली येथे गुन्हा दाखल

‘मन की बात’ कार्यक्रमाचे पुस्तक छापण्यावरून लुबाडले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमावरून पुस्तक काढण्याची बतावणी करत पैसे लाटणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. कक्ष-11 गुन्हे शाखा, कांदिवली, मुंबई यांनी ही कारवाई केली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करून त्यांच्या “मन की बात” या कार्यक्रमाचा सार ग्रंथ प्रकाशन करण्यासाठी विविध मार्गाने निधी गोळा करून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यासाठी आलोक रंजन कृपाशंकर तिवारी व अभ्युदय वात्सल्यम चे इतर संस्थापक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

९ डिसेंबर रोजी फिर्यादी केशव सिंग, वय ४९ वर्ष याने तक्रार अर्ज देऊन कक्ष-११ येथे कळविले की, अभ्युदय वात्सल्यम या मासिक बातमीपत्राचे संस्थापक व एडिटर चीफ आलोक तिवारी याच्याकडे कोणतीही परवानगी नसताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करून त्यांच्या आतापर्यंत झालेल्या “मन की बात” या कार्यक्रमाच्या भाषणाचा ‘सार ग्रंथ’ तयार करून सदर पुस्तकाचे प्रकाशन हे मार्च २०२३ मध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रकाशित करणार असल्याचे खोटे जाहीर करण्यात आले.

हे ही वाचा:

तब्बल १५० कोटी ट्विटर युजर्सचे अकाउंट होणार बॅन! जाणून घ्या कारण

एका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण

एनआयएने पुन्हा जारी केले चार दहशतवाद्यांचे पोस्टर

महाराष्ट्रात ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांची पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

ते ‘सार ग्रंथ’ प्रकाशित करण्यासाठी माहितीपत्रक सोशल मीडियाद्वारे व वैयक्तिक पाठवून पुस्तक प्रकाशासाठी विविध मार्गाने निधी गोळा करीत आहेत, असेही सांगण्यात आले. अशा प्रलोभनाला फिर्यादी बळी पडले व त्यांच्याकडील ४००१/- रुपये हे संपादकाला पाठवले. त्या रकमेची फसवणूक झाली आहे.

तसेच मुंबईतील अन्य मोठमोठ्या उद्योजकांची व इतर यांची फसवणूक झाल्याची शक्यता असल्याने अभ्युदय वात्सल्यम या मासिक बातमीपत्राचे एडिटर चीफ आलोक तिवारी व इतर संस्थापक यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दिल्याने वरिष्ठांशी चर्चा करून, चौकशी अंती वरिष्ठांचे मंजुरीचे वरिल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे पूर्व परवानगीने कक्ष-११ करीत आहे.

Exit mobile version